Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळाची गुजरात किनाऱ्याला धडक!

Cyclone Biparjoy:  बिपरजॉय चक्रीवादळाची गुजरात किनाऱ्याला धडक!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : बिपरॉय जॉय चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याला धडकलं आहे. ताशी १३० किमीच्या वेगाने वारे वाहात आहेत. तसंच पाऊसही सुरु झाला आहे. भारत सरकारतर्फे नुकसान रोखण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न सुरु आहे. भारतीय लष्कर, एनडीआरएफसह सर्व यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत.

अनेक भागात पाऊस

चक्रीवादळामुळे गुजरातच्या अनेक भागात जोरदार वारे वाहत असून पाऊस पडत आहे. IMD नुसार, गुजरातच्या द्वारका, जामनगर, पोरबंदर, मोरबी, राजकोट, जुनागढ, अमरेली, भावनगर, गिर सोमनाथ आणि कच्छ जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तासांत गडगडाट आणि ताशी 40 किमी वेगाने वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारपासून समुद्रात 4 ते 5 फूट उंच लाटा उसळत आहेत.

IMD चे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्र यांनी सांगितलं की सध्या ११५ ते १२५ किमी. प्रतितास वेगाने वारे वाहात आहेत. सौराष्ट आणि कच्छ या ठिकाणी मुसळधार पाऊस आहेत. मध्यरात्रीपर्यंत हे वादळ धडकण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे.

हवामान विभागाने लोकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. मुसळधार पाऊस आणि तुफानी वारे वाहतील. काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासह भारतीय लष्कर, वायुदल आणि नौदल सज्ज करण्यात आले होते. या वादळाचा सामना करण्यासाठी ६ एनडीआरएफ, ३ आरपीएफ टीम, २ एसडीआरएफ टीम आणि ८ सेनेच्या टीम तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनाकडून सतर्कता बाळगली गेल्याने, मोठया प्रमाणात जिवीत हानी टाळता आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news