पुढारी ऑनलाइन डेस्क : Cyber Fraud : दिवाळी उत्सव जवळ आला आहे. दिवाळी निमित्त सायबर चोरटे या संधीचा फसवणुकीसाठी पूर्ण फायदा उचलण्यासाठी तयार आहेत. फ्री दिवाळी गिफ्टच्या नावाने ही फसवणूक होऊ शकते. त्यामुळे इंडियन कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) अशा पद्धतींच्या घोटाळ्यांपासून किंवा फसवणुकीपासून सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
माहितीनुसार, काही चायनीज वेबसाइट्स हे सोशल मीडियाच्या माध्यमातून फिशिंग लिंक पाठवून फ्री दिवाळी गिफ्टचे आमिष दाखवत आहे. ही लिंक तुमची संवेदनशील वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी पाठविली जात आहे. ज्यामध्ये बँक खात्याचे तपशील, फोन नंबर आणि अन्य माहितीचा समावेश आहे.
Cyber Fraud : CERT-In ने यासंबंधी लोकांना सावध आणि सुरक्षित राहण्यासाठी सल्ला दिला आहे. अशा पद्धतीचे जाली संदेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की व्हॉट्स अप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम इत्यादींच्या माध्यमातून पाठवले जात आहे. ज्यामध्ये तुमच्यासाठी दिवाळीचे हमखास फ्री गिफ्ट आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त लिंकवर क्लिक करायचे आहे. तसेच विशेषतः महिलांना भीती घालून लिंक त्यांच्या संपर्कातील लोकांना फॉरवर्ड करण्यासाठी सांगत आहे. त्यामुळे अशा आमिषांना आणि भीतीला बळी पडू नका, असा सल्ला The CERT-In ने दिला आहे.
The CERT-In ने असेही स्पष्ट केले आहे की यापैकी सर्वात जास्त वेबसाईट या चायनीज आहे. या वेबसाईट Chinese.cn domain extensions वापरत आहेत. तर दुस-या वेबसाईट्स .xyz आणि .top अशा प्रकारचे एक्सटेंशन वापरत आहेत. अशा फेक लिंक पासून सावध राहण्यास सूचवले आहे.