पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli New Record : आयपीएल 2024 च्या हंगामाची सुरुवात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूने यांच्या सामन्याने झाले. चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराटने या मॅचमध्ये सहा धावा करत इतिहास रचला. टी-20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला. त्याच वेळी, सर्वात जलद 12 हजार पूर्ण करण्याच्या बाबतीत तो ख्रिस गेलचा विक्रम मोडण्यास तो चुकला. तो दुसऱ्या स्थानावर आहे.
विराटने चेन्नईविरुद्ध सहा धावा करत टी-20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला आणि जगातील सहावा फलंदाज ठरला. त्याच्या आधी गेल, पाकिस्तानचा शोएब मलिक, वेस्ट इंडिजचा केरॉन पोलार्ड, इंग्लंडचा ॲलेक्स हेल्स, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांनी ही कामगिरी केली आहे. यासोबतच विराटने सर्वात कमी 360 डावात ही कामगिरी केली आहे. या बाबतीत गेल पहिल्या क्रमांकावर आहे. गेलने टी-20 क्रिकेटमध्ये केवळ 345 डावांमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
14562 : ख्रिस गेल
13360 : शोएब मलिक
12900 : किरॉन पोलार्ड
12319 : ॲलेक्स हेल्म्स
12065 : डेव्हिड वॉर्नर
12015* : विराट कोहली
345 डाव : ख्रिस गेल
360 डाव : विराट कोहली
368 डाव : डेव्हिड वॉर्नर
432 डाव : ॲलेक्स हेल्स
451 डाव : शोएब मलिक
550 डाव : किरॉन पोलार्ड