CSK Performance in IPL Playoffs : आयपीएलच्या प्लेऑफमध्ये CSKची कशी आहे कामगिरी? जाणून घ्या आकडेवारी

CSK Performance in IPL Playoffs : आयपीएलच्या प्लेऑफमध्ये CSKची कशी आहे कामगिरी? जाणून घ्या आकडेवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : csk performance in ipl playoffs : आयपीएलस्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली असून गुजरात टायटन्स (GT), चेन्नई सुपर किंग्स (CSK), मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. पहिला क्वालिफायर सामना गुजरात आणि CSK यांच्यात मंगळवारी (23 मे) होणार आहे. सीएसकेने 12व्यांदा प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

IPL 2023 मध्ये CSK ची कामगिरी कशी होती?

IPL 2023 मध्ये CSK ने 14 पैकी 8 सामने जिंकले, तर पाच गमावले आहेत. याशिवाय 1 सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही.

17 गुणांसह दुसरे स्थान पटकावले

लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी)चे देखील 17 गुण होते. तथापि, CSK (+0.652)चा नेट रन रेट LSG (+0.284) पेक्षा चांगला आहे.

विक्रमी 12व्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश

सीएसके आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली हा संघ 14 पैकी विक्रमी 12व्यांदा प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. अखेरच्यावेळीस त्यांनी 2021 मध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्या हंगामात धोनीच्या संघाने अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) पराभव करून विजेतेपद पटकावले होते. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात बंदी घातल्यामुळे सीएसकेचा संघ 2016 आणि 2017 मध्ये आयपीएल खेळू शकला नव्हता.

प्लेऑफमधील 24 पैकी 15 सामन्यांत विजय

आतापर्यंत CSK ने IPL प्लेऑफमध्ये एकूण 24 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी 15 जिंकले असून 9 सामन्यांत हार पत्करली आहेत. या सामन्यांमध्ये CSK ची सर्वोच्च धावसंख्या 5 बाद 222 आहे, जी त्यांनी IPL 2012 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (तत्कालीन दिल्ली डेअरडेव्हिल्स) विरुद्ध केली होती. त्याचवेळी, प्लेऑफमध्ये सीएसकेची सर्वात कमी धावसंख्या 162 आहे.

रैनाने सर्वाधिक धावा, तर ब्राव्होने सर्वाधिक विकेट घेतल्या

सुरेश रैनाने सीएसकेसाठी प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. या माजी डावखु-या फलंदाजाने या सामन्यांमध्ये 41.88 च्या सरासरीने आणि 159.64 च्या स्ट्राइक रेटने 712 धावा वसूल केल्या आहेत. या यादीत त्याच्या खालोखाल महेंद्रसिंग धोनी (472) आहे. शेन वॉटसन (118 vs SRH, IPL 2018) च्या नावावर CSK कडून प्लेऑफमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम आहे. ड्वेन ब्राव्होने (26) सीएसकेसाठी प्लेऑफमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.

रैनाने मारले सर्वाधिक चौकार आणि षटकार

रैनाने प्लेऑफमध्ये सीएसकेसाठी सर्वाधिक चौकार (51) आणि षटकार (40) मारले आहेत. त्याच वेळी, प्लेऑफमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम डग बोलिंगर (4/13 vs RCB, IPL 2010) च्या नावावर आहे.

सीएसकेने आतापर्यंत पटकावली 4 विजेतेपदे

CSK हा IPL इतिहासात सर्वाधिक 9 फायनल खेळणारा संघ आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 4 वेळा (2010, 2011, 2018, 2021) विजेतेपद पटकावले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news