IPL 2024 पूर्वी CSK ला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू जखमी; बाहेर पडण्याचा धोका

IPL 2024 पूर्वी CSK ला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू जखमी; बाहेर पडण्याचा धोका

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीसीसीआयने आयपीएल 2024 चे (IPL 2024) वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. पण या प्रतिष्ठीत स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. ही लीग मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयपीएल 2024 पूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार खेळाडू शिवम दुबे दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या रणजी ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत. या स्पर्धेदरम्यान मुंबई संघाचा स्टार अष्टपैलू शिवम दुबे जखमी झाला आहे. वृत्तानुसार, शिवम दुबे साइड स्ट्रेनच्या दुखापतीमुळे उर्वरित रणजी ट्रॉफी सामन्यांमधून बाहेर राहू शकतो. मुंबई संघाला 23 फेब्रुवारीपासून बडोद्याविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळायचा आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठीचा संघ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

शिवम दुबे जबरदस्त फॉर्ममध्ये (IPL 2024)

दुबेने रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या मोसमात पाच सामन्यांत 67.83 च्या सरासरीने 407 धावा केल्या आहेत, ज्यात 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने गोलंदाजीतही आपली छाप सोडली असून 12 बळी घेतले आहेत. याआधी त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतही टीम इंडियासाठी शानदार खेळ केला होता आणि तो प्लेअर ऑफ द सीरीज ठरला होता.

सीएसकेचा महत्त्वाचा खेळाडू (IPL 2024)

गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यात शिवम दुबेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने 16 सामन्यात 38.00 च्या सरासरीने 418 धावा फटकाल्या होत्या. या काळात त्याच्या बॅटमधून 3 अर्धशतके झळकली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news