crude Oil prices : रशिया- युक्रेनमध्ये वाटाघाटीच्या शक्यतेने कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

crude Oil prices : रशिया- युक्रेनमध्ये वाटाघाटीच्या शक्यतेने कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

रशिया युक्रेन (russian invasion of ukraine) सोबत ठोस वाटाघाटी करण्यास इच्छुक असल्याच्या शक्यतेने सोमवारी सकाळी कच्च्या तेलाचे (crude Oil prices) दर प्रति बॅरेल ४ डॉलरने कमी झाले. सोमवारी ब्रेंट क्रूड फ्यूचर्सचा दर प्रति बॅरेल १०८.५५ डॉलर एवढा होता. अमेरिकेने रशियन तेलाच्या आयातीवर बंदी घातल्यानंतर जागतिक बाजारात तेलाच्या किमतीने २००८ नंतर प्रथमच उच्चांक गाठला होता.
अमेरिकेच्या उपपरराष्ट्र मंत्री वेंडी शर्मन यांनी रविवारी सांगितले होते की, जरी रशिया युक्रेनवर "उद्ध्वस्त" करण्याच्या उद्देशाने हल्ले करत असले तरी रशिया युक्रेन सोबत ठोस वाटाघाटी करण्यास इच्छुक असल्याची चिन्हे दिसत आहेत.

रशिया हा क्रूड तेलाचा जगातील मोठा निर्यातदार आहे. रशियातून दररोज सुमारे ७० लाख बॅरेल तेलाचा जगात पुरवठा होतो. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर तेलाच्या किमती ३० टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्या होत्या. रशियावरील वाढत्या निर्बंधांमुळे तेल पुरवठ्यात आणखी व्यत्यय येण्याच्या शक्यता आहे. यामुळे खरेदीला चालना मिळाली असल्याचे विश्लेषकांनी म्हणणे आहे.

अर्थतज्‍ज्ञांच्‍या मतानुसार, रशिया आणि युक्रेन युद्धाचा कालावधी वाढल्‍यास कच्‍च्‍या तेलाच्‍या किंमतीमध्‍ये (Crude Oil Price) आणखी वाढ होवू शकते. याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर होईल. पेट्रोल आणि डिझेलच्‍या किंमतींमध्‍ये प्रति लीटर १० ते १५ रुपये वाढ होण्‍याची शक्‍यता आहे. पेट्रोल-डिझेल किंमतीच भडका उडाल्‍यानंतर भारतातील अत्‍यावश्‍यक सेवांसह अन्‍नधान्‍य किंमतीमध्‍येही वाढ होईल. कच्‍च्‍या तेलाच्‍या किंमतीमध्‍ये झालेल्‍या वाढ ही भारतासाठी मोठी डोकदुखी ठरणार आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : रशिया -युक्रेन युद्ध :पुढे काय होणार?|What effect will the Russia-Ukraine crisis have on the world?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news