CRPF ९ हजारांहून अधिक कॉन्स्टेबल पदासाठी भरती, अर्ज करण्‍याची मुदत वाढवली

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल पदासाठी बंपर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. आता या भरती प्रक्रियेमधील मोठी अपडेट समोर आली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीखेमध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे. या पदांसाठी पूर्वी अर्ज करण्‍याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०२३ होती. आता या भरतीसाठी २ मे २०२३ अंतिम तारीख करण्‍यात आली आहे. ( CRPF constable Recruitment )

१४८ पदांची भर

यापूर्वी सीआरपीएफच्या या भरती मोहिमेद्वारे एकूण ९२१२ पदे भरली जाणार होती. यापैकी ९१०५ पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत तर १०७ पदे महिला उमेदवारांसाठी आहेत. मात्र आता त्यात आणखी १४८ पदांची भर पडली आहे. या पदांवर बगलर, स्वयंपाकी, सफाई कामगार, ड्रायव्हर, नाई, धुलाई आणि सुतार यांचाही समावेश आहे.

अर्ज सादर करण्‍याची मूदत वाढवली

केंद्रीय राखीव पोलिस दलातील बंपर पदांसाठी उमेदवारांच्या अर्जाची अंतिम तारीख आणखी वाढवण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. पूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2023 होती, आता ती 02 मे 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

CRPF constable Recruitment  : शैक्षणिक पात्रता

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल उमेदवारांनी केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १० वी उत्तीर्ण केलेली असावी. कॉन्स्टेबल भरती उमेदवाराकडे हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स असणे किंवा ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदासाठी १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे. तर इतर पदांसाठी ती १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावी असे सांगण्यात आले आहे.

अर्ज शुल्क

केंद्रीय राखील पोलिस दलातील (CRPF) कॉन्स्टेबल या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पुरुष उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर महिला उमेदवार आणि एससी, एसटी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

CRPF constable Recruitment : महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची आणि फी भरण्याची अंतिमची तारीख – २ मे २०२३
  • संगणक आधारित चाचणीसाठी प्रवेशपत्र येण्याची तारीख – २० जून ते २६ जून २०२३
  • संगणक आधारित चाचणीची तारीख -१ जुलै ते १३ जुलै २०२३

CRPF constable Recruitment : असा करा अर्ज

  • सर्वप्रथम केंद्रीय राखील पोलिस दलाच्या (CRPF) अधिकृत वेबसाइट crpf.gov.in ला भेट द्या.
  • Recruitment टॅबवर क्लिक करा.
  • संपूर्ण अर्ज व्यवस्थित लक्षपूर्वक भरा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट काढून घ्या.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news