Cristiano Ronaldo-Salman Khan : रोनाल्डोने ‘भाईजान’कडे वळूनही पाहिलं नाही! (Video)

Cristiano Ronaldo-Salman Khan
Cristiano Ronaldo-Salman Khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खानला प्रसिद्ध फुटबॉल पटू रोनाल्डोने चक्क सार्वजनिक ठिकाणी इग्नोर केलं. रियाधमधून या दोघांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.(Cristiano Ronaldo-Salman Khan) हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. युजर्स म्हणाले की, हा इंटरनॅशनल आपमान आहे. (Cristiano Ronaldo-Salman Khan)

संबंधित बातम्या –

बॉलिवूडचा दबंग सलमान खानला कोण ओळखत नाही. संपूर्ण जगभर सलमान खानचे फॅन्स आहेत. सलमानची एक झलक पाहण्यासाठी लोक किती उत्सुक असतात. पण इथे मात्र उलट घडले आहे. सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दावा केला जात आहे की, सुपरस्टार फुटबॉल पटू रोनाल्डोने सलमान खानला सपशेल इग्नोर केलं.

सलमान खान सध्या सऊदी अरब येथे रियाधमध्ये उपस्थित होता. Francis Ngannouu आणि Tyson Fury यांच्यातील हाय – प्रोफाईल हेवी वेट बॉक्सिंग मॅचमध्ये सलमान खान स्पॉट झाला.

आणखी एका व्हिडिओमध्ये सलमान खानच्या शेजारी रोनाल्डोची गर्लफ्रेंड Georgina आणि रोनाल्डो बसलेले दिसत आहेत.

या हायप्रोफाईल बॉक्सिंग मॅच जगभरात अनेक सेलेब्सने अटेंड केलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फाईट संपताच सलमान आणि रोनाल्डो एक्झिट करताना दिसले. रोनाल्डो व्हिडिओमध्ये सऊदी शेखच्या नजीक दिसतो आहे. तो त्यांना आलिंगनही देताना दिसतो. सलमान, त्याच्यापासून जवळच उभा आहे. पण, त्याने साधे वळूनही सलमानकडे पाहिले नाही. तो तसाच पुढे निघून जाताना दिसतो. पुढे जान अन्य व्यक्तींची भेट घेताना दिसतो.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणत आहेत की, रोनाल्डोने सपशेल सलमानला इग्नोर केलं. एका नेटकऱ्याने लिहिलं-इंटरनॅशनल अपमान. दुसऱ्याने म्हटलं – टायगर केवळ भारतात जीवंत आहे. तर काही फॅन्सनी म्हटलंय की, असं होऊ शकतं की, ते आधी भेटले असावेत. पण, व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं नाही.

(video- Priya Sharan x वरून साभार)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news