Rishabh Pant Health Update | ऋषभ पंतला आज एयरलिफ्ट करुन उपचारासाठी मुंबईला हलवणार

Rishabh Pant
Rishabh Pant
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भीषण अपघातात जखमी झालेल्या भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant Health Update) याला पुढील उपचारासाठी आज मुंबईला हलवण्यात येणार आहे, अशी माहिती दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे संचालक श्याम शर्मा यांनी दिली आहे. ३० डिसेंबर रोजी झालेल्या कार अपघातानंतर ऋषभ पंत सध्या डेहराडूनमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आता त्याला एयरलिफ्ट करुन मुंबईला उपचारासाठी नेण्यात येणार आहे.

उत्तराखंडमधील रुरकीजवळ ३० डिसेंबरच्या पहाटे त्याच्या कारचा अपघात झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अत्यंत भीषण अशा अपघातात केवळ दैवबलवत्तर म्हणून ऋषभ पंत वाचला गेला. एकीकडे ऋषभ पंतचे लाखो चाहते त्याच्या लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा देत आहेत. दुसरीकडे, त्यांच्या तब्बेतीतील सुधारणांच्या बातम्यांकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीचा दिल्लीहून घरी परतताना अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन सीमेवर त्याच्या कारला अपघात झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या कपाळाला आणि पायाला दुखापत झाली आहे. किमान सहा महिने तरी ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर परतणार नसल्याने त्याच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच तळ्यात-मळ्यात असलेल्या त्याच्या कारकिर्दीला मोठा सेटबॅक बसण्याची शक्यता आहे.

लिगामेंट टियर ट्रिटमेंट होणार

ऋषभ पंतच्या दुखापती अजूनही गंभीर दिसत आहेत, रुग्णालयाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, पंतला बरे होण्यासाठी ६ महिने लागू शकतात. क्रिकबझच्या वृत्तानुसार, ऋषभच्या उजव्या गुडघ्यावर लिगामेंट टियर ट्रिटमेंट केली जाणार आहे. त्यानंतरच पंतचे मैदानात पुनरागमन होणार आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. लिगामेंट हाडांना एकमेकांना बांधून ठेवण्याचे काम करते. लिगामेंटला दुखापत झाल्यास गुडघा नीट काम करू शकत नाही. खेळाच्या मैदानात अनेकवेळा खेळाडूंना लिगामेंटच्या दुखापतींना सामोरे जावे लागते. (Rishabh Pant Health Update)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news