Kevin Pietersen : पीटरसनचे पॅनकार्ड हरवले, PM मोदींकडे केली मदतीची याचना

Kevin Pietersen : पीटरसनचे पॅनकार्ड हरवले, PM मोदींकडे केली मदतीची याचना
Kevin Pietersen : पीटरसनचे पॅनकार्ड हरवले, PM मोदींकडे केली मदतीची याचना

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनचे (Kevin Pietersen) पॅनकार्ड हरवले आहे. पीटरसन सोमवारी भारत दौऱ्यावर येणार आहे. तो आयपीएलमधील अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्री करतो. पीटरसनने मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली. त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग करत मदतीची याचना केली आहे. दरम्यान, भारतीय आयकर विभागानेही पीटरसनला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

पीटरसनने (Kevin Pietersen) इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये ट्विट केले आहे. त्याने लिहिलंय की, भारत कृपया मदत करा, माझे पॅन कार्ड हरवले आहे. कामासाठी मला फिजिकल कार्ड हवे आहे. कृपया माझ्या मदतीसाठी शक्य तितक्या लवकर संपर्क शकाल का?' या ट्विटमध्ये त्याने पंतप्रधान मोदींना टॅग केले.

पीटरसनच्या (Kevin Pietersen) ट्विटला भारतीय आयकर विभागाने उत्तर दिले आहे, त्यांनी ट्विटकरून पिटरसनला महत्त्वाची माहिती दिली आहे, या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'जर तुमच्याकडे पॅन कार्डची माहिती असेल, तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करून तुमचे फिजिकल पॅन कार्ड मिळवू शकता.' आयटी विभागाने काही लिंक शेअर केल्या आहेत. या मध्ये 'https://www.tin-nsdl.com/services/pan/pan-index.html' आणि 'https://www.pan.utiitsl.com/PAN/mainform.html' या वेबसाईट्सचा समावेश आहे.

ट्विटमध्ये पुढे म्हटले की, जर तुम्हाला पॅन कार्डबद्दल काहीही आठवत नसेल आणि तुम्हाला फिजिकल कार्डसाठी पॅनचा ॲक्सेस पाहिजे आहे तर तुम्ही आम्हाला 'adg1.systems@incometax.gov.in, jd.systems1.1@incometax.gov.in' या ई-मेलवर देखील संपर्क साधू शकता.

यावर उत्तर देताना पीटरसनने (Kevin Pietersen) प्राप्तिकर विभागाचे आभार मानले आहेत. तो म्हणाला की, माहितीसाठी धन्यवाद. मी तुम्हाला ईमेल केला आहे. मी तुम्हाला फॉले देखील केले आहे. जर कोणी मला वैयक्तिक मॅसेज केला तर मला त्यांच्याशी काहीतरी बोलायचे आहे.

पीटरसनचे भारतावरील प्रेम सर्वश्रुत आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी पीटरसनला पत्रही लिहिले होते. यानंतर पीटरसननेही पीएम मोदींचे आभार मानले. पीटरसन अनेकदा समालोचनासाठी भारतात येत असतो. तो आयपीएलमधील कॉमेंट्री पॅनलशीही संबंधित आहे. पीटरसन आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, सनरायझर्स हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि पुणे सुपरजायंट्स यांसारख्या संघांसाठी खेळला आहे.

पीटरसनने १०४ कसोटी सामन्यांमध्ये ८ हजारांहून अधिक धावा केल्या…

केविन पीटरसेने १०४ कसोटी सामन्यांमध्ये २३ शतकांच्या मदतीने ८,१८१ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या २२७ धावा आहे. १३६ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये या स्टायलिश फलंदाजाच्या नावावर ४,४४० धावा आहेत ज्यात ९ शतकांचाही समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news