पुढारी ऑनलाईन डेस्क: चीनमध्ये वाढत असलेल्या करोना रुग्णांच्या पार्श्व्रभूमीवर खबरदारी म्हणून भारतामध्ये ताजमहालला येणाऱ्या पर्यटकांवर कोरोन चाचणी सक्तीची केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी अनिल सत्संगी यांनी सांगितले आहे. ताजमहालाला परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असल्याने हे निर्बंध घालण्यात आले आहेत. Covid Restrictions
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (दि.२२) घोषित केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी एका दिवसामध्ये देशात १३१ केसेस नोंद झाल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या पर्यटकांवर काही बंधने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज (गुरुवार) संसदेच्या सर्व सदस्यांना कोरोनाबाबत सतर्क आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. Covid Restrictions
हेही वाचा :