पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत जगाला मोठा दिलासा दिला आहे. WHO ने कोविडबद्दल मोठी घोषणा केली आणि म्हटले की कोविड ही आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणी नाही. याबाबतचा निर्णय आपत्कालीन समितीच्या 15 व्या बैठकीत घेण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी कोविड-19 महामारीचा दर्जा कमी केला. ही आता जागतिक आणीबाणी राहिलेली नसल्याची घोषणा करत WHO ने कोरोना विषाणू आता जागतिक आरोग्य आणीबाणी नाही, असे स्पष्ट केले.
चीनच्या वुहान लॅबमधून उद्भवलेल्या कोरोना व्हायरसने 2019 ते 2023 या काळात संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. त्यानंतर WHO ने तीन वर्षांपूर्वी 30 जानेवारी 2020 रोजी या आणीबाणीची घोषणा केली होती.