Covid-19 Updates : दिलासादायक, कोरोना रुग्णसंख्येत सलग दोन दिवस घट, २४ तासात ६,६६० रुग्णांची नोंद

Covid-19 Updates : दिलासादायक, कोरोना रुग्णसंख्येत सलग दोन दिवस घट, २४ तासात ६,६६० रुग्णांची नोंद

पुढारी ऑनलाईन: देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सलग दोन दिवस घट दिसून येत आहे. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाल आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे ६ हजार ६६०  नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ६३, ३८० वर पोहोचली आहे. कोरोना रिकव्हरी रेट ९८.६७ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात आठवडाभरात ७३,८७३ रुग्णांची नोंद

देशात मागील आठवड्यात कोरोनाच्या ७३,८७३ रुग्णांची नोंद झाली. त्याआधीच्या आठवड्यात ६१,५०६ रुग्ण आढळून आले होते. याचाच अर्थ कोरोनाची नवीन लाट गेल्या दोन आठवड्यात शिगेला पोहोचण्याची चिन्हे होती. गेल्या आठवडाभरातील ही रुग्णसंख्या ८ महिन्यांतील सर्वाधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर सलग दोन दिवस कोरोना रुग्णात झालेली घट दिलासादायक आहे.

केरळनंतर दिल्लीत धोका वाढला

दिल्ली, हरियाणा आणि तामिळनाडूमधील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. केरळनंतर दिल्लीत रुग्णसंख्या वाढली आहे. येथे गेल्या आठवडाभरात सुमारे १० हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. पण, देशाच्या अनेक भागांमध्ये रुग्ण वाढत असताना देशाच्या पूर्वेकडील राज्यात रुग्णवाढीचे प्रमाण कमी आहे.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांची घट

महाराष्ट्रात रविवारी ५४५ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १४१ रुग्ण मुंबईतील आहेत. शनिवारी राज्यात ८५० रुग्ण आढळून आले होते. पण रविवारी रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांची घट झाली. मुंबई आणि रत्नागिरीत प्रत्येकी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news