Covid-19 updates : कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत वाढ तर सक्रिय रुग्णसंख्येत घट; वाचा 24 तासातील आकडेवारी

Covid-19 India Updates
Covid-19 India Updates

पुढारी ऑनलाईन:  देशात कोरोनाच्या परिस्थितीबाबत सातत्याने चढ उतार पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्येत घट दिसून येत होती. मात्र आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत जवळपास 3 हजारांनी वाढ दिसून येत आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे ९ हजार ६२९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर त्यापूर्वी 6 हजार 660 इतकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली होती. कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत वाढ दिसून येत असली तरी देशातील सक्रिय रुग्णसंख्येत घट नोंदवली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या ६१, ०१३ वर पोहोचली आहे. कोरोना रिकव्हरी रेट ९८.६७ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Covid-19 updates )

मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे २२०.६६ कोटी डोस देण्यात आले आहेत.

केरळनंतर दिल्लीत धोका वाढला

दिल्ली, हरियाणा आणि तामिळनाडूमधील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. केरळनंतर दिल्लीत रुग्णसंख्या वाढली आहे. येथे गेल्या आठवडाभरात सुमारे १० हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. पण, देशाच्या अनेक भागांमध्ये रुग्ण वाढत असताना देशाच्या पूर्वेकडील राज्यात रुग्णवाढीचे प्रमाण कमी आहे.

आठ राज्यांना कोविडच्या वाढीदरम्यान सतर्क राहण्यासाठी पत्र

तत्पूर्वी, आरोग्य मंत्रालयाने आठ राज्यांना कोविडच्या वाढीदरम्यान सतर्क राहण्यासाठी शुक्रवारी (दि.२१ एप्रिल) पत्र लिहिले आहे. ज्यात कोविड-19 प्रकरणांची वाढती संख्या पाहता, पाळत ठेवण्याच्या उपायांना चालना देण्यासाठी आणि रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि हरियाणा यांना लिहिलेल्या पत्रात, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी जोर दिला की साथीच्या रोगाचा प्रसार फार दूर आहे आणि संसर्गाचा प्रसार नियंत्रित करणे अत्यंत महत्वाचे आहे.

गेल्या २४ तासांत ७८,३४२ चाचण्या

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दैनिक सकारात्मकता दर ९.१६ टक्के आहे आणि साप्ताहिक सकारात्मकता दर ५.४१ टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत एकूण ९२.५४ कोटी चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी ७८,३४२ चाचण्या गेल्या २४ तासांत घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात रविवारी (दि.२३) ५४५ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १४१ रुग्ण मुंबईतील आहेत. शनिवारी राज्यात ८५० रुग्ण आढळून आले होते. पण रविवारी रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांची घट झाली. मुंबई आणि रत्नागिरीत प्रत्येकी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news