पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत ५० टक्क्यांनी वाढ दिसून येत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,०१६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट २.७३ टक्के आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १३,५०९ वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गंभीर बाब म्हणजे देशात १५३ दिवसांनंतर रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
गेल्या २४ तासांत १,३९६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर आतापर्यंत देशातील ४ कोटी ४१ लाख ६८ हजार ३२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण ५ लाख ३० हजार ८६२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर २,२०,६५,९२,४८१ कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, दिल्लीत ३०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोघा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Corona Updates)
देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा 'अलर्ट मोड'वर आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता.
हे ही वाचा :