दिलासादायक ! राज्यातील कोरोना रुग्णसंख्येसह मृत्युदरातही घट

दिलासादायक ! राज्यातील कोरोना रुग्णसंख्येसह मृत्युदरातही घट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या या आठवड्यात कमी झाली असून, जिल्ह्यामध्ये चाचण्यांचे प्रमाणदेखील वाढल्याने दैनंदिन बाधित रुग्णांचा दरही कमी झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सरकारकडून कोरोना नियंत्रित करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

कोरोना नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्युदर कमी झाला. या आठवड्यात मृत्युदर 0.36 वरून 0.26 वर पर्यंत कमी झाला आहे. मागील आठवड्यात कोरोना बाधितांचा दर 6.3 होता, तो आता या आठवड्यात 4.3 इतका आहे. कोरोना चाचणीमध्ये या आठवड्यात दररोज सरासरी साडेचौदा हजार तपासण्या करण्यात येत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news