newborn baby कोरोनामुळे नवजातांच्या मेंदूवर प्रभाव शक्य!

newborn baby
newborn baby
Published on
Updated on

लंडन : सध्या कोरोना विषाणू संसर्गाचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. अमेरिकेत दोन नवजात मुलांच्या मेंदूचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या नवजातांच्या मातांना गर्भवती असताना कोरोना झाला होता.

संशोधक सुरुवातीपासूनच कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या परिणामांवर दावे करत आहेत. त्यांचे म्हणणे हळूहळू खरे ठरत आहे. आता असे समोर आले आहे की, अमेरिकेतील कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलांच्या मुलांचे ब्रेन डॅमेज झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गर्भात असताना या नवजातांच्या मातांना कोरोनाची लागण झाली होती आणि संसर्ग प्लेसेंटामध्ये पसरला होता.

'पेडियाट्रिक्स जर्नल'मध्ये यासंबंधीचा अहवाल प्रकाशित झाला आहे, मियामी विद्यापीठाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. यामध्ये संशोधकांनी सांगितले की, मुलांच्या मातांना दुसर्‍या तिमाहीत संसर्ग झाला होता. 2020 मध्ये, लस येण्यापूर्वी त्यांना डेल्टा व्हेरियंटची बाधा झाली होती, जेव्हा तेथे कोरोना संसर्ग सर्वोच्च पातळीवर होता. संशोधकांनी दावा केला की, मुलांना जन्मावेळी फेफरे येऊ लागले आणि नंतर त्यांच्यामध्ये दुसर्‍या काही तक्रारीही दिसून आल्या.

ब्रेन डॅमेजसह जन्मलेल्या या दोन मुलांपैकी एक 13 महिन्यांत मरण पावले, तर दुसर्‍याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले. मियामी विद्यापीठातील बालरोगतज्ज्ञ आणि सहायक प्राध्यापक डॉ. मर्लिन बेनी यांनी सांगितले की, कोणत्याही मुलांना कोरोनाची लागण झालेली नाही. मात्र, त्यांच्या शरीरात कोरोना अँटिबॉडीज आढळून आल्या. संशोधकांनी सांगितले की, यावरून असे सूचित होते की, संसर्ग गर्भवती महिलांच्या नाळेमध्ये आणि नंतर मुलांमध्ये प्रवेश करू शकतो. त्यामुळे मुलांच्या मेंदूलाही इजा होऊ शकते.

संशोधकांनी सांगितले की, आतापर्यंत मुलांना जन्म देणार्‍या महिलांच्या प्लेसेंटामध्ये संसर्ग झाल्याचे पुरावे आढळले आहेत. मुलांच्या मेंदूमध्येही विषाणूच्या खुणा आढळल्या, ज्यावरून असे स्पष्ट होते की, कोरोनामुळे मेंदूचे मोठे नुकसान होऊ शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news