माध्यान्ह भोजनात शिजला साप!

माध्यान्ह भोजनात शिजला साप!

पाटणा, वृत्तसंस्था : बिहारमधील अररिया जिल्ह्यातील फारबिसगंज येथील सरकारी शाळेत माध्यान्ह भोजनात शिजलेला साप आढळला.
एका स्वयंसेवी संस्थेकडून हे जेवण शाळेत आणले गेले. मुलांना वाढण्यात आले. एका ताटात चक्क शिजलेला साप आढळला. यानंतर शाळेत एकच गोंधळ उडाला. मुलांना उलट्या होऊ लागल्या.

सुमारे 50 मुलांना तातडीने उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र कुमार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news