नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आज, गुरुवारी पुढे ढकलण्यात आली. 29 ऑगस्ट ला याप्रकरणी घटनापीठ सुनावणी घेणार आहे.मंगळवारी झालेल्या सुनावणीत हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर, आज (दि. 25) याप्रकरणी सुनावणी होणार होती. परंतु, सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा हे 27 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत.त्यानंतर उदय लळीत सरन्याधीशपदाचा पदभार स्वीकारतील.त्यामुळे पुढील सुनावणी नव्या सरन्यायाधीशांसमोर होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी 23 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत हे प्रकरण 25 ऑगस्टला लिस्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते.परंतु, आज या प्रकरणावर सुनावणी न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.