पुढारी ऑनलाईन डेस्क : एका हॅकरने मध्यप्रदेश काँग्रेसचे ट्विटर खाते हॅक केले. गुरुवारी (22 डिसेंबर) मध्यप्रदेश काँग्रेसने स्वतःच याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, "मध्यप्रदेश कॉंग्रेसचं ट्विटर अकाउंट रात्री ११.१५ च्या सुमारास हॅक झाले होते. १:०१ पूर्वरत करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी. (Congress Twitter Hack)
माहितीनुसार गुरुवारी रात्री ११.१५ च्या सुमारास हॅकरने मध्यप्रदेश काँग्रेसचे अधिकृत ट्विटर हॅक केले. त्यानंतर काही अंतराने सहा ट्विट केली गेली. या ट्विटच्या माध्यमातून एका बेवसाईटचे प्रमोशन केले आणि सहापैकी २ ट्विट हे क्रिप्टो करन्सी बद्दल होते. हे प्रकरण लक्षात येताच २ तासात मध्यप्रदेश काँग्रेसकडून तातडीच्या हालचाली करत आपलं ट्विटर अकाउंट पूर्ववत करण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याचे तुम्ही पाहिलं असेल. या वर्षात काही चर्चेतील काही हल्ले पुढीलप्रमाणे
हेही वाचा