Chandrasekhar Bawankule: काँग्रेसने पक्ष सांभाळावा, आम्ही कुठेही भूकंप घडवणार नाही: चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे हेच 2024 पर्यंत मुख्यमंत्री राहणार आहेत, हे मी अनेक वेळा बोललो आहे. काँग्रेस पक्षात भूकंप होणार आहे का? हे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट करावे, आम्ही कुठेही भूकंप घडवणार नाही. मात्र, काँग्रेस पक्षातून कोणी भाजपमध्ये येणार असेल, तर त्यांच्यासाठी भाजपचे दुपट्टे तयार आहेत, असे स्पष्ट संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिले.

बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले की,काँग्रेसमधून कोणी पक्ष प्रवेश करणार असतील, तर निश्चित त्यांना पक्षप्रवेश देऊ. मात्र, आम्ही स्वतः राजकीय भूकंप घडवणार नाही. आता काँग्रेसने आपले सदस्य, पक्ष सांभाळून ठेवावा, असा सबुरीचा सल्लाही दिला. खरेतर उद्धव ठाकरे यांची स्मृती गेली आहे. 2019 मध्ये मतपेटीनेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, असा कौल दिला होता. मात्र, तुम्ही तेव्हा बेईमानी केली. जनतेने मतपेटीतून निवडून दिलेल्या सरकारला सत्तेवर न येऊ देता, तुम्ही शरद पवारांसोबत कट करून सत्तेवर आले. उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर कोर्ट जे निर्णय घ्यायचे आहे ते घेईल. मात्र, विधानसभा अध्यक्ष योग्य ती कारवाई करत आहेत.

उद्धव ठाकरे राजकारणातील खालच्या स्तरावर उतरले आहेत. म्हणूनच ते आई-वडिलांची आणि पोहरादेवीची शपथ घेत आहेत. राजकारणाचा स्तर किती खाली जाऊ शकतो, हे दिसून येत आहेत. आमचे नेते अमित शहा जे बोलतात तेच करतात. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना भावासारखे सांभाळले होते. मात्र, त्यांना बेईमानी करायची होती, ती उद्धव ठाकरे यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ न देण्यासाठी शरद पवारांच्या कटाला साथ द्यायची होती, ती त्यांनी दिली, आता त्यांना शुभेच्छा, असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news