पणजी : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात उत्तर आणि दक्षिण गोव्यासह मध्य प्रदेशातील मोरेना, ग्वाल्हेर, खंडवा तसेच दादर आणि नगर हवेली येथील जागांचा समावेश आहे. काँग्रेसने दक्षिण गोव्यातील पक्षाचे विद्यमान खासदार फ्रान्सिस्को सार्दिन यांना लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीतून वगळले आहे. काँग्रेसने दक्षिण गोव्यातून कॅप्टन विरियेतो फर्नांडिस यांना उमेदवारी दिली आहे. तर उत्तर गोव्यातून रमाकांत खलप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. (Lok Sabha Elections 2024)
लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले आहेत. उत्तरेतून माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप आणि दक्षिणेतून प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस कॅप्टन विरियेतो फर्नांडिस याना उमेदवारी जाहीर झाली आहे.
दक्षिण गोव्याचे खासदार सार्दिन यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. शनिवारी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली. त्यात एकूण सहा उमेदवारांची यादी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केली. त्यानुसार उत्तर गोव्यातून खलप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दक्षिण गोव्यातून कॅप्टन विरियेतो फर्नांडिस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण गोव्याचे विद्यमान खासदार फ्रान्सिस्को सार्दिन यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
लोकसभेच्या गोव्यामध्ये दोन जागा आहेत. उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातून भाजप आणि रिव्होल्युशनरी गोवन्स अर्थात आरजी या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार यापूर्वी जाहीर करुन प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. (Lok Sabha Elections 2024)
हे ही वाचा :