मुंबईत काँग्रेस आणि भाजप एकमेकांना भिडले; कार्यकर्त्यांना उचलताना पोलीसांना ‘बाहुबली’ होण्याची वेळ !

मुंबईत काँग्रेस आणि भाजप एकमेकांना भिडले; कार्यकर्त्यांना उचलताना पोलीसांना ‘बाहुबली’ होण्याची वेळ !
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : पेगासस चौकशी प्रकरणावरून आज मुंबईत भाजप कार्यालयावर काँगेसकडून मोर्चा नेण्यात आला. या मोर्चाला विरोध करण्यासाठी भाजपकडून आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दोन्हीकडील कार्यकर्ते आमनेसामने आल्याने पोलीसांना हस्तक्षेप करावा लागला. प्रमुख कार्यकर्त्याना पोलीसांनी उचलल्यामुळे आंदोलनात अनर्थ टळला.

यावेळी अनेक कार्यकर्त्यांची पोलीसांनी धरपकड केली. भाजप आमदार प्रसाद लाड, मंगल प्रभात लोढा यांच्यासह भाजप कार्यकर्ते मुंबईतील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्यास बसले होते. त्याचवेळी काँग्रेस कार्यकर्ते कार्यालयाकडे येत असल्याचे समजताच भाजप कार्यकर्तेही त्यांच्या दिशेने गेले. त्यामुळे पोलिसांना रस्त्यावर उतरुन भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखले. पोलिसांनी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी आणि भाजपचे मंगल प्रभात लोढा यांनाही ताब्यात घेतले.

हे ही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news