पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज (दि.१३ मार्च) 'नारी न्याय गॅरंटी'ची घोषणा केली. या याेजनेच्या माध्यमातून सत्तेत आल्यास काँग्रेस पक्ष महिलांसाठी पाच विशेष याेजना राबविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
खर्गे म्हणाले की, काँग्रेस आज 'नारी न्याय गॅरंटी' ( महिला न्याय हमी) घोषणा जाहीर करत आहे. केंद्रात सत्तेत आल्यास या योजने अंतर्गत काँग्रेस पक्ष देशातील महिलांसाठी एक नवा अजेंडा ठरवणार आहे.
यावेळी खर्गे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने यापूर्वी आम्ही सहभागी न्याय, शेतकरी न्याय आणि युवा न्याय जाहीर केला आहे. आमची आश्वासने ही पोकळ आश्वासने आणि विधाने नाहीत. आम्ही आमच्या शब्दाला जागतो. हा आमचा 1926 पासून आतापर्यंतचा विक्रम आहे, आमचे विरोधक जन्माला आल्यापासून आम्ही जाहीरनामे बनवत आलो आहोत आणि त्या घोषणांची पूर्तता करत आहोत.