पुढारी ऑनलाइन डेस्क : Congress : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी काल बुधवारी काँग्रेसमध्ये आता कार्यकारिणी ऐवजी सुकाणू समितीची स्थापना केली आहे. माहितीनुसार, खर्गे यांनी स्थापन केलेल्या या सुकाणू समितीत गांधी कुटुंबीयांच्या सदस्यांसह माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांच्यासह एकूण 47 वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. ही समिती कार्यकारिणी समितीच्या जागेवर काम करेल.
Congress : काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या सदस्यांनी काल आपल्या पदावरून राजीनामे दिले होते. काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि AICC चे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे की काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, AICC चे महासचिव आणि इनचार्ज यांनी आपले राजीनामे अध्यक्षांकडे सुपूर्त केले आहे.
Congress : मल्लिकार्जून खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षांच्या रुपात पदभार काल स्वीकारला. यावेळी सोनिया गांधी यांनी आज त्या निश्चिंतपणाचा अनुभव करत आहेत. या पदावर त्यांनी जवळपास 23 वर्षांपर्यंत कार्य केले होते. त्यांनी म्हटले की त्यांनी स्वतःच्या पूर्ण क्षमतेने कार्य केले. आता त्या या जबाबदारीतून मुक्त होत आहेत. माझ्या खांद्यावरून मोठे ओझे खाली उतरले आहे. आता एक मोठी जबाबदारी मल्लिकार्जून खरगे यांच्यावर आहे.
Congress : तसेच देशात सध्या लोकतांत्रिक मूल्यांना वाचवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. मला विश्वास आहे की संपूर्ण पक्षाला खरगे यांच्याकडून प्रेरणा मिळेल. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस मजबूत होईल, असे त्या म्हणाल्या.
हे ही वाचा :