Odisha Train Tragedy : रेल्‍वे अपघातानंतर हजारो तिकीट रद्दचा काँग्रेसचा आरोप, IRCTC दिले उत्तर…

Odisha Train Tragedy : रेल्‍वे अपघातानंतर हजारो तिकीट रद्दचा काँग्रेसचा आरोप, IRCTC दिले उत्तर…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ओडिशामधील भीषण रेल्‍वे अपघतानंतर राजकीय आरोप-प्रत्‍यारोपांचे सत्र सुरुच राहिले आहे. (Odisha Train Tragedy) शतकातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताची चौकशी सुरू सीबीआयने सुरु केली आहे. दरम्‍यान, या भीषण अपघातानंतर हजारो प्रवाशांनी भयभीत होवून आपली रेल्‍वे तिकिटे रद्द केली आहेत, असा आरोप काँग्रेसने केला होता. आता त्‍याला रेल्वे तिकीट बुकिंगचे व्यवस्थापन करणाऱ्या IRCTC ट्विट करून उत्तर दिले आहे. (Odisha Train Tragedy)

हजारो प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याचा काँग्रेसचा दावा

ओडिशाचे काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास यांनी पत्रकार परिषदेमध्‍ये केंद्र सरकारवर हल्‍लाबोल केला होता. या भीषण अपघातात शेकडो लोकांना जीव गमवावा लागला आणि हजाराहून अधिक लोक जखमी झाले. या घटनेने सर्वांचे मन दुखावले आहे. एवढेच नाही तर अपघातानंतर हजारो लोकांनी तिकीट रद्द केल्याचा दावा त्यांनी केला होता. ट्रेनमध्ये प्रवास करणे सुरक्षित नाही, असे प्रवाशांना वाटते असेही त्‍यांनी म्‍हटले होते.

माहिती चुकीची : IRCTC

माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास यांच्‍या आरोप निराधार असल्‍याचे IRCTCने स्‍पष्‍ट केले आहे. IRCTC ट्विटमध्‍ये म्‍हटले आहे की, ही माहिती चुकीची आहे. रेल्‍वे तिकिट रद्द करण्‍याचे प्रमाण वाढलेले नाही. याउलट तिकीट रद्द करण्‍याचे प्रमाण अपघाताच्या एक दिवस आधी म्‍हणजे १ जून २०२३ रोजी ७.७ लाख हाेते ते  3 जून 2022 रोजी 7.5 लाखांवर घसरले.

Odisha Train Tragedy : सीबीआयाने केला गुन्‍हा दाखल

ओडिशा रेल्वे अपघातात आतापर्यंत २७८ जणांचा मृत्यू झाला असल्‍याची माहिती सरकारी यंत्रणांनी दिली आहे. दरम्यान, सीबीआयनेही अपघाताचा तपास सुरू केला आहे. सीबीआयच्या १० सदस्यीय पथकाने सोमवारी बालासोर रेल्वे अपघातस्थळी भेट दिली, अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news