‘जेंटलमॅन’ शब्दावरून लोकसभेत कलगीतुरा

India-Bharat :
India-Bharat :
Published on
Updated on

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : लोकसभेत केवळ एका शब्दामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला. महिला व बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी बीजेडीच्या खासदाराला सभागृहात सदस्यांसाठी वापरला जाणारा 'माननीय सदस्य' ऐवजी 'जेंटलमॅन' शब्द वापरला. यावर काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी आक्षेप नोंदवला. दरम्यान काँग्रेसच्या काही सदस्यांनी त्यांचे समर्थन केल्याने सभागृहात काही काळ गदारोळ बघायला मिळाला.

बीजू जनता दलाचे खासदार चंद्रशेखर साहू यांनी प्रश्नोत्तराच्या काळात ईराणी यांच्या मंत्रालयाशी संबंधित पूरक प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देतांना केंद्रीय मंत्री ईराणी यांनी त्यांना 'जेंटलमॅन' म्हणून संबोधित केले. परंतु, संबंधित खासदार या सभागृहाचे सदस्य आहेत, त्यांना अशाप्रकारे जेंटलमॅन संबोधने योग्य नाही, असा आक्षेप चौधरी यांनी नोंदवला. मंत्र्यांना 'माननीय सदस्य' म्हणावे, अशी सूचना देखील त्यांनी केली. परंतु, ते केवळ पक्षश्रेष्ठींना प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत आहे. सभागृहात केवळ गदारोळ घालून ते शाब्बासकी घेवू इच्छितात. मी या जेंटलमॅनला सांगू इच्छिते की, त्यांचे प्रयत्न त्यांच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचले आहेत, असा टोला चौधरी यांचे नाव न घेता ईराणी यांनी लगावला. हा शाब्दिक कलगीतुरा रंगला असताना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी देखील उपस्थित होत्या.

खासदार शाहू यांनी 'माननीय मॅडम' असे संबोधित करीत दुसरा पुरक प्रश्न विचारला तेव्हा प्रश्नाचे उत्तर देताना 'माननीय जेंटलमॅन' यांनी सन्मानपूर्वक 'मॅडम' म्हणून संबोधित केल्याने आभार व्यक्त करते, अशी भावना ईराणींनी व्यक्त केली. यावर पुन्हा चौधरी यांनी आक्षेप नोंदवला. तेव्हा इतर सदस्यांनी देखील त्यांना आवाजी समर्थन दर्शवले. सन्मान दिल्याने राजकीय कारणाने त्रास दिला जात आहे. सभागृहात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा पुरस्कार करणाऱ्या जेंटलमॅनने अशाप्रकारे सभागृहात उभे होवून एका महिलेला त्रास देणे योग्य नाही, असा संताप ईराणी यांनी चौधरी यांचे नाव न घेता व्यक्त केला. यापूर्वी देखील स्मृती ईराणी आणि काँग्रेस खासदारांमध्ये अशा प्रकारच्या शब्दावरून वाक् युद्ध बघायला मिळाले होते.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news