scholarship : शिष्यवृत्तीने पूर्ण करा परदेशातील शिक्षण

scholarship : शिष्यवृत्तीने पूर्ण करा परदेशातील शिक्षण

परदेशी विद्यापीठाच्या मदतीने उच्च शिक्षण घेण्यासाठी भारत सरकार किंवा अन्य देशांकडून मिळणारी सरकारी फेलोशिप किंवा अनुदान हा एक चांगला आणि सुलभ पर्याय मानला जातो; मात्र हा पर्याय इथपर्यंतच मर्यादित नाही. अशा अनेक संस्था, संघटना आहेत की, जे परदेशात उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी फेलोशिप उपलब्ध करून देतात. त्याचवेळी तेथे
येण्या-जाण्याचे, राहण्याचे आणि शैक्षणिक शुल्काचे नियोजन करतात.

परदेशात अभ्यास करण्यासाठीचे इच्छुक विद्यार्थी हे आपल्या कुटुंबावर अतिरिक्त आर्थिक ताण पडणार नाही यासाठी स्कॉलरशिपच्या शोधात असतात. त्यामुळे अनेकदा परदेशात आपल्याला प्रवेश मिळतो, मात्र तात्काळरित्या शिष्यवृत्ती न मिळाल्याने अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. आजच्या घडीला भारतीय मूल्य डॉलरच्या प्रमाणात ज्यारितीने कमी होत चालले आहे ते पाहता परदेशातील शिक्षण महाग होत चालले आहे. यासंदर्भात काही खास शिष्यवृत्तीबाबत जाणून घेऊ या, जेणेकरून परदेशातील शिक्षणाचे स्वप्न आपले साकार होऊ शकतो.

शेवनिंग स्कॉलरशिप

शेवनिंग स्कॉलरशिप हे ब्रिटन सरकारच्या जागतिक स्कॉलरशिप योजनेचा एक भाग आहे. हे जगातील विद्यार्थ्यांना ब्रिटिश संस्थेत मास्टर डिग्री करणार्‍या सुमारे 1500 विद्यार्थ्यांना फंड देण्याचे काम करते. यानुसार विद्यार्थ्यांना ट्यूशन फिस, मासिक स्टायपेंड, ब्रिटनला येण्या-जाण्याचा भत्ता आदी उपलब्ध करून देते. अधिक माहितीसाठी : https://chevening.org./

टाटा स्कॉलरशिप

टाटा स्कॉलरशिप ही दरवर्षी 20 भारतीय विद्यार्थ्यांना प्रदान केली जाते. कॉर्नेल विद्यापीठात अभ्यास करणारे आणि ज्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण भारतात घेतलेले आहे, असे विद्यार्थी या स्कॉलरशिपला पात्र ठरतात. अधिक माहितीसाठी : https://www. tatatrusts.org/

एपीजे अब्दुल कलाम फेलोशिप

माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावर विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. फ्लोरिडा यूनिर्व्हसिटीत काही खास विषयात डॉक्टरेट करण्यासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते. यासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी : https://www.usf.edu/world/for-faculty/funding-resources/ kalam-fellowship.aspx

फुलब्राईट-नेहरू मास्टर्स स्कॉलरशिप

फुलब्राइट-नेहरू मास्टर्स स्कॉलरशिप अशा विद्यार्थ्यांना दिली जाते की, जे अमेरिकी कॉलेज आणि विद्यापीठात मास्टर डिग्री करण्यास इच्छुक आहेत. आर्टस अँड कल्चर, मॅनेजमेंट, हेरिटेज कन्झर्व्हेशन, म्युझियम स्टडिज, पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, पब्लिक हेल्थ, अर्बन अँड रिजनल प्लॅनिंग, वुमेन्स स्टडिज किंवा जेंडर स्टडीजचा अभ्यास करणार्‍या इच्छुक विद्यार्थ्यांना अशा प्रकारची स्कॉलरशीप दिली जाते. यासाठी अर्जाची शेवटची तारीख ही दरवर्षी जूनपर्यंतच असते. अधिक माहितीसाठी : https://www.usief.org.in/Fulbright-Nehru-Fellowships .aspx

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news