मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राणा दाम्पत्यांना खार पोलिसांनी 6.30 वाजणेच्या सुमारास ताब्यात घेतले. आणि त्यांच्यावर कलम १५३ (अ) अंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. तर उद्या त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान राणा दाम्पत्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात खार पोलिस ठाणे येथेच तक्रार दिली.
यामध्ये राणा दाम्पत्यांनी म्हटले आहे, लोकांनी आमच्या घरासमोर गैरपदृधतीने आंदोलन केले. तसेच अमरावती येथील घराला लोकांनी वेढा दिला आहे. तसेच आम्हाला जीवे मारण्यासाठी संजय राऊत यांनी लोकांनी चिखावले आहे. आणि हा त्यांचा कट होता. त्यामूळे अॅम्ब्युलन्सही त्यांनी आमच्या घराबाहेर आणली होती. तर आमच्या जीवाला धोका आहे आणि आम्हाला काही झाले तर त्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब हे जबाबदार राहतील, असे राणा दाम्पत्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या 9.30 वाजता ते खार पोलिस ठाण्यात जाणार आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले उद्धव ठाकरे यांना कोणती भिती वाटते आहे असा सवाल त्यांनी केला. तसेच ते हनुमान चालिसाच वाचणार हाेते असे ते म्हणाले.
हेही वाचा