Commonwealth Games 2022 : प्रियांका गोस्‍वामीने दहा हजार मीटर चालण्‍याच्‍या स्‍पर्धेत पटकावले रौप्‍य पदक

Commonwealth Games 2022 :  प्रियांका गोस्‍वामीने दहा हजार मीटर चालण्‍याच्‍या स्‍पर्धेत पटकावले रौप्‍य पदक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महिलांच्‍या दहा हजार मीटर चालण्‍याच्‍या स्‍पर्धेत भारताच्‍या प्रियंका गोस्‍वामीने रौप्‍य पदक पटकावले. तिने ( ४३.३८. ८३ ) मिनिटांमध्‍ये ही स्‍पर्धा पूर्ण केली. ऑस्‍ट्रेलियाच्‍या जेमिमा हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर केनियाच्‍या एमिली ही तिसर्‍या स्‍थानावर राहिली.

महिला कुस्‍तीपटू विनेश फोगाट, बॉक्‍सिंगमध्‍ये नीतू फायनलमध्‍ये

राष्‍ट्रकूल स्‍पर्धेत महिला कुस्‍तीपटू विनेश फोगाट आणि बॉक्‍सिंगमध्‍ये नीतू यांनी फायनलमध्‍ये धडक मारली. ५३ किलो गट वजनात विनेश फोगाटने आपला तिसरा सामना जिंकला. तिने नायजेरियाच्‍या महिला कुस्‍तीपटूला ६-० असे पराभूत केले. बॉक्‍सिंगमध्‍ये ४८ किलो वजन गटात नीतूने सेमीफायनलमध्‍ये कॅनडाच्‍या प्रियंका ढिल्‍लोनचा दोन राउंडमध्‍ये ५-० असा पराभव केला. या दोन फैर्‍यानंतर सामना पंचांनी थांबवत नीतूला विजयी घोषित केले. या दमदार कामगिरीमुळे या दोन खेळाडूंनी किमान रौप्‍य पदक निश्‍चित केले आहे.

भारताचे आतापर्यंतचे पदक विजेता खालीलप्रमाणे

सुवर्ण पदक : मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, वेटलिप्‍टिंग सुधीर, कुस्‍तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पूनिया.
रौप्‍य पदक : संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशु मलिक, प्रियंका गाेस्‍वामी
कांस्‍य : गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरुदीप सिंह, तेजस्‍विन शंकर, दिव्‍या काकरन, मोहित ग्रेवाल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news