सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत!

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत!
Published on
Updated on

पुणे : मुद्रांक शुल्क आणि रेडिरेकनर दरामध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय आज राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बांधकाम क्षेत्रासाठी हा मोठा दिलासा देणारा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया क्रेडाई पुणे मेट्रो या बांधकाम संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.

याबाबत क्रेडाई पुणे मेट्रोचे रणजित नाईकनवरे म्हणाले, रेडिरेकनर दराबाबतच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. याबाबत क्रेडाइने केलेल्या शिफारशी राज्य शासनाने विचारात घेतल्या, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. क्रेडाई पुणे मेट्रो ही संस्था भविष्यात देखील आपल्या सर्व भागधारकांच्या सहकार्याने उद्योजक आणि घरखरेदीदार यांचा आवाज बनत, त्यांचे मत मांडण्यासाठी कार्यरत राहील.

आज जाहीर झालेल्या या निर्णयाचा बांधकाम उद्योगावर सकारात्मक परिणाम होईल, तसेच या उद्योगाच्या विकासाबरोबरच रोजगारनिर्मतिी व अर्थव्यवस्थेच्या विकासालादेखील चालना मिळेल.
                                          – सतीश मगर, क्रेडाई, राष्ट्रीय अध्यक्ष.

आजच्या निर्णयामुळे निश्चितपणे घरखरेदीला चालना मिळणार आहे. स्टॅम्प ड्यूटीवाढीचा ग्राहकांना फटका बसत असतो. शासनाने हा चांगला निर्णय घेतला आहे. महागाई वाढत असताना रेडिरेकनरची न केलेली दरवाढ हा दिलासा आहे.

                                 – कृष्णकुमार गोयल, बांधकाम व्यावसायिक.

अक्षयतृतीयेला खरेदी-विक्री जास्तीत जास्त प्रमाणात होईल. खरेदी किंमती वाढल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. जमिनीची खरेदी-विक्री मंदावत असते. या निर्णयाने निश्चित फायदा होईल

                                      – महेश कुंटे, बांधकाम व्यावसायिक.

आम्ही बांधकाम व्यावसायिक समाधानी आहोत. दरनिश्चितीमुळे बांधकाम व्यवसायवाढीस चालना मिळेल असा विश्वास आहे. शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

                                             -गजेंद्र पवार, बांधकाम व्यावसायिक

बांधकाम व्यवसायात तेजी होणार नाही. पाच ते दहा टक्के घरांच्या किंमती वाढल्या असत्या. मात्र या निर्णयामुळे घरांच्या किंमती स्थिर राहण्यास मदत होणार आहे. शासनाचेदेखील कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. चांगला निर्णय घेतला आहे.

                                        – जयंत शहा, बांधकाम व्यावसायिक

शासनाच्या निर्णयामुळे याचा घर खरेदी करणार्‍यांना निश्चितपणे फायदा होणार आहे. लोकांच्या मनात एक प्रकारची दरवाढीची भीती होती. यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे.
                                             कल्पेश शहा, बांधकाम व्यावसायिक

एएसआर) दर राखण्यासाठी सरकारने घेतलेल्या सकारात्मक उपाययोजनांमुळे घर
खरेदीदार आणि एकूणच स्थावर मालमत्तेवरील भार कमी होईल आणि त्यामुळे कोणत्याही प्रतिकूल जागतिक आर्थकि प्रवृत्तींकडे भारतीय अर्थव्यवस्था अधिक लवचिक होईल.

                             -आनंद नाईकनवरे, हेड बिजनेस प्रोसेस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news