Rs 2000 notes : दोन हजारांच्या नोटा बदलण्यास एजंटांना कमिशन

Rs 2000 notes
Rs 2000 notes

भुवनेश्वर; वृत्तसंस्था : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) विभागीय शाखेसमोर रांगा लावून एजंट लोक अन्य व्यक्तींच्या दोन हजारांच्या नोटा बदलून घेत असल्याचे चित्र आहे. दोन हजारांच्या दहा नोटा बदलून दिल्यानंतर संबंधितांना 300 ते 500 रुपये मिळत असल्याची माहिती पुढे आली आहे.

दोन हजारांच्या नोटा बँकांत बदलून मिळण्याची मुदत संपल्यानंतर या नोटा आरबीआय अथवा आरबीआयच्या विभागीय शाखांमध्ये बदलून देण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आरबीआयच्या शाखांसमोर रांगा लागत आहे. तीन ते चार रांगेत थांबून अन्य व्यक्तींच्या नोटा बदलून देण्यासाठी कमिशन घेतले जात आहे. प्रति दहा नोटांमागे 500 रुपयांपर्यंत कमिशन मिळत आहे. 7 ऑक्टोबरनंतर आरबीआयमध्ये दोन हजारांच्या नोटा बदलून दिल्या जात आहेत. त्यामुळे आरबीआयसमोर दररोज सहाशे ते सातशे लोकांची राग पहावयास मिळत आहे.

दरम्यान, ओडिशा सरकारमधील वित्तीय विभागातील अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली आहे. काही एजंट आधारकार्ड घेऊन रांगेत उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना कमिशन मिळत असल्यामुळे ते रांगेत दीर्घकाळ थांबून नोटा बदलून घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

केवळ 5 टक्केनोटाच बँकेत जमा

आरबीआयमध्ये रोज दोन हजारांच्या 2 कोटी मूल्यांच्या दोन हजारांच्या नोटा जमा होत आहे. त्यापैकी 95 टक्के नोटा बदलून दिल्या जात असून, केवळ 5 टक्केनोटाच बँकेत जमा केल्या जात आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news