धगधगणारा विदर्भ राज्यात सर्वांत थंड, तर तापमानात यवतमाळ शहर अव्वल

धगधगणारा विदर्भ राज्यात सर्वांत थंड, तर तापमानात यवतमाळ शहर अव्वल

पुणे : दरवर्षी उन्हाळ्यात उष्णतेच्या आगीत धगधगणारा विदर्भ गुरुवारी चक्क संपूर्ण राज्यात थंड ठरला. तेथे किमान तापमानात तब्बल 6 ते 9.8 अंशांनी तर कमाल तापमानात 6 ते 7 अंशांनी घसरण झाली होती. सतत पडणार्‍या अवकाळी पावसाचा हा परिणाम यंदा प्रथमच अशा प्रकारे दिसतोय. बुधवारपर्यंत विदर्भात ऊन आणि पाऊस यांच्यात स्पर्धा सुरू होती.

सतत पाऊस अन् गारपीट असूनही तापमान 40 ते 42 अंशांवर होते, मात्र गुरुवारी विदर्भाचे कमाल तापमान 35 ते 36 अंशांवर खाली आले. तर किमान तापमानात उष्णतेच्या लाटेत होरपळणारे यवतमाळ शहर राज्यात अव्वल ठरले. तेथील किमान तापमान 16.5 अंशांवर खाली आले. किमान तापमानात चक्क 9.8 टक्क्यांनी घसरण झाली. यवतमाळने सर्वात थंड समजल्या जाणार्‍या महाबळेश्वरलाही मागे टाकले.

विदर्भात अशी झाली घसरण (कंसात किमान तापमान)-
यवतमाळ 34 (16.5), अकोला 35.8 (20.3), अमरावती 35.4 (18.4), बुलडाणा 35 (19.3), ब—ह्मपुरी 37.2 (20), चंद्रपूर 36.8 (19.6), गोंदिया 35.5 (22.1), नागपूर 33.6 ( 19.4), वर्धा 33.2 (18.6),

उर्वरित राज्याचे कमाल तापमान

पुणे 35.6, जळगाव 37.7, कोल्हापूर 35.4, महाबळेश्वर 30.9, नाशिक 35.8, सोलापूर 39, मुंबई 33.2, रत्नागिरी 33.5, छत्रपती संभाजीनगर 36.1.

गारपिटीचा इशारा

कमी दाबाच्या पट्यामुळे मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मोठी गारपीट होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्र, विदर्भातही अवकाळी पावसाचा 30 एप्रिलपर्यंत जोर राहणार आहे. कोकणात त्या तुलनेत कमी पाऊस आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news