Cold Wave : राज्यात ३१ जानेवारीपर्यंत थंडीच्या लाटेची शक्यता

Cold Wave : राज्यात ३१ जानेवारीपर्यंत थंडीच्या लाटेची शक्यता

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रात ३१ जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ही लाट प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ अन् मराठवाड्यात राहील. दरम्यान, शनिवारी अहमदनगर (८.५), जळगाव (९.९), नाशिक (११.८), पुणे (१२.७) अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात वाढणार कडाका

मध्य-महाराष्ट्रात शनिवारी थंडीच्या लाटेची तीव्रता कमी झाली. या भागातील किमान तापमानात ३ ते ४ अंशांनी वाढ झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला. पुणे शहराचे किमान तापमान ७.५ अंशांवरून थेट ११.६ ते १२.७ अंशांवर गेले. मात्र, विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात लाट तीव्र आहे. तेथील किमान तापमानाचा पारा अजूनही ८.५ ते १० अंशांवर आहे.

शनिवारचे किमान तापमान

मालेगाव १०, गोंदिया १०.५, नागपूर ११.१, वाशिम ११, यवतमाळ ११, छत्रपती संभाजीनगर १२.८, महाबळेश्वर १४.५, मुंबई २०.७, रत्नागिरी २१, कोल्हापूर १८.६, सांगली १८.१, सातारा १६, सोलापूर १९.४, धाराशिव १८.१, परभणी १३.८, नांदेड १३.८

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news