लोकशाहीचा विजय झाला, टीका करणाऱ्यांना आधीपासूनच सवय : मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकशाहीचा विजय झाला, टीका करणाऱ्यांना आधीपासूनच आरोप करण्याची सवय आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. ठाकरेंचे आमदार अपात्र झाले नाहीत, हे अनपेक्षित घडल्याचे ते म्हणाले. आमदार अपात्र केसवरून ते मीडियाशी बोलत होते. एकनाथ शिंदे ठाण्यातील आनंद आश्रमातून बोलत होते.

संबंधित बातम्या –

ते म्हणाले, लोकशाहीत कुणालाही मनमानी करता येणार नाही. बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जातोय. विधिमंडळात आमचे बहुमत आहे. भरत गोगावलेच प्रतोद आहेत. लोकशाहीचा विजय झाला. सत्यमेव जयते कालच्या निकालाने दाखवून दिले. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. बहुमत असल्यामुळे हा निकाल लागला आहे.

अध्यक्षांवर घटनात्मक दर्जाचे पद असलेल्या व्यक्तींवर खालच्या भाषेत टीका केली. पण त्याला मी उत्तर देत बसणार नाही. दीड वर्षात आम्ही जे काम करतो, त्याची पोचपावती जनता नक्की देईल. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे.

लोकशाहीमध्ये पक्षांतर्गतही लोकशाही आहे. कसंही वागता येणार नाही, निर्णय घेता येणार नाही. अध्यक्षांच्या निकालाबाबत लीगल टीमशी चर्चा झाली. पक्ष कुणाची एकाची खासगी संस्था नसते. पक्षामध्ये कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागते. तर तो पक्ष मोठा होतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news