ढगांनी अडवली पुणेकरांची गुलाबी थंडी!

ढगांनी अडवली पुणेकरांची गुलाबी थंडी!
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : डिसेंबर संपत आला, तरीही शहरात यंदा पुणेकरांना कडाक्याची थंडी अनुभवता आली नाही. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही शहरात ढगाळ वातावरण राहणार असल्याने पारा 13 अंशांवर स्थिर राहणार असल्याचा अंदाज पुणे
वेधशाळेने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात यंदा वारंवार चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने राज्यासह पुणे शहरातही ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे नोव्हेंबरपाठोपाठ डिसेंबर महिनाही कडाक्याच्या थंडीविना जाणार आहे.

नोव्हेंबरमध्ये अवघे सात दिवस थंडी जाणवली. त्यानंतर डिसेंबरमध्ये शहर गारठून गुलाबी थंडीचा आनंद घेता येईल, असे वाटत होते. मात्र, डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात बंगालच्या उपसागरात 'मैदास' नावाचे चक्रीवादळ आल्याने पंधरा ते वीस दिवस शहरावर ढगांची गर्दी असल्याने कडाक्याच्या थंडीचा महिना असूनही 25 डिसेंबरपर्यत थंडी जाणवली नाही.

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, डिसेंबरचा शेवटचा आठवडा देखील कडाक्याच्या थंडीचा राहणार नाही. कारण, शहरावर अजूनही ढग असून, 29 पासून पुन्हा ढगांची गर्दी होत आहे. त्यामुळे वार्‍याचा वेगही मंदावला असून, शहराचे किमान तापमान 1 जानेवारीपर्यंत 13 अंशांवर स्थिर राहणार आहे. रविवारी शहराचे किमान तापमान 11.6 अंशांवर होते. मात्र, सोमवारी त्यात वाढ होऊन ते 12.1 अंशांवर गेले होते. तसेच, पिंपरी-चिंचवड, मगरपट्टा या भागांचेही किमान तापमान 16 व 17 अंशांवर गेले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news