mosquito : हवामान बदलामुळे वाढला डासांमुळे फैलावणार्‍या आजारांचा धोका

the mosquito
the mosquito

वॉशिंग्टन : हवामान बदल व जागतिक तापमानवाढ यामुळे डासांमुळे फैलावणार्‍या आजारांचा धोका वाढला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. उष्णता वाढल्यावर डासांचा प्रजनन काळ सुरू होतो. त्यामुळे त्यांच्या संख्येत वाढ होते. आता जगाचेच तापमान वाढत असल्याने साहजिकच डासांचीही संख्या वाढून त्यांच्यामार्फत फैलावणार्‍या मलेरिया, झिका, डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या विविध आजारांचा धोकाही वाढू शकतो. ज्याठिकाणी डासांची संख्या कमी होती अशा ठिकाणीही डास वाढू शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अभिजीत दास या संशोधकाने म्हटले आहे की उप-सहारा आफ्रिका, आग्नेय आशिया आणि लॅटिन अमेरिकेत आधीच डासांमुळे फैलावणार्‍या आजारांचा प्रकोप आहे. आता युरोपमध्येही तो दिसून येऊ लागला आहे. तापमान वाढल्याने पर्यावरणाची स्थितीही बदलत जाते. अशावेळी आजारांचा धोकाही वाढतो. डासांचा प्रजनन काळ वाढल्याने त्यांची संख्या वाढते. जर दहा वर्षांमध्ये डासांचा प्रजनन हंगाम पाच महिन्यांचा होता तर तो आता वाढून सहा-सात महिन्यांचा असू शकतो. हे प्रचलन यापुढेही वाढू शकते.

'एक्सप्लोरेशन इन लॅबोरेटरी एनिमन सायन्स' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 'वर्ल्ड मॉस्किटो प्रोग्राम'चे संचालक डॉ. केट अँड्रेज यांनीही हवामान बदलामुळे डासजनित आजारांचा धोका वाढेल असे म्हटले आहे. युरोपमध्ये मलेरियाच्या प्रकरणात 62 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते तसेच डेंग्यू, झिका आणि चिकुनगुनियाच्या प्रकरणांमध्ये 700 पट वाढ होऊ शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news