छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर चकमक; १० नक्षलवादी ठार

file photo
file photo

रायपूर; वृत्तसंस्था : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील नारायणपूरच्या अबुझमदमधील तकामेटा भागात मंगळवारी सकाळी डीआरजी, एसटीएफच्या जवानांसोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली. चकमकीत 10 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. मृतांमध्ये 2 महिला नक्षलवादी आहेत. सर्वांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

एके-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. चकमकीनंतरही शोधमोहीम सुरूच असल्याचे सांगण्यात येते. तकामेटामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी जमलेले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे सोमवारी रात्री उशिरा जवान या भागाकडे निघाले. मंगळवारी सकाळी ते या भागात पोहोचताच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news