CISCE Board 12th Result 2024: सीआयएससीई बोर्डच्या १२ परीक्षेत अनुभूती निवासी स्कूलचे घवघवीत यश

CISCE Board 12th Result 2024: सीआयएससीई बोर्डच्या १२ परीक्षेत अनुभूती निवासी स्कूलचे घवघवीत यश
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकाल जाहिर झाला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. सीआयएससीई बोर्डच्या १२ वी इयत्तेत कॉमर्स शाखेतील विद्यार्थी तुषार कावरे हा ९४.५० टक्के गुणांसह पहिला आला. विज्ञान शाखेतून देबर्णा दास ९२.५० टक्के प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली, याशिवाय जेईई मेन्स २०२४ च्या ऑल इंडीया रँकमध्ये देबर्णा दास हिने ५६९६ रँक प्राप्त केले आहे.

अनुभूती निवासी स्कूल ही भविष्याशी निगडीत अनुभवाधारीत शिक्षण देणारी स्कूल आहे. सीआयसीएसई या पॅटर्नची खानदेशातील पहिलीच शाळा आहे. परस्परांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण होणे यादृष्टीने गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले जातात. छंद जोपासत वर्षभर होणाऱ्या विविध स्पर्धा, उपक्रमांमध्ये कौशल्य दाखवित विद्यार्थीही यश संपादित करतात. कॉमर्स शाखेत प्रथम आलेल्या तुषार कावरे याला इंग्रजीत ९४, अर्थशास्त्र ९३, अकाऊंट ९२, वाणिज्य ९८, बिजनेस स्टडी ९३ गुण मिळाले आहेत. तर विज्ञान शाखेत प्रथम आलेल्या देबर्णा दास हिला इंग्रजीत ९२, केमिस्ट्रीत ९१, फिजीक्स ८९, बायोलॉजी ९१, गणित ९६ गुण प्राप्त झाले आहेत.

भविष्याचे वेध घेत असताना शैक्षणिक अभ्यासक्रमासह आपल्यातील सूप्त कलागुणांना जोपासून विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या आधारे प्राप्त केलेले यश गौरवास्पद आहे. यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद, शिक्षकतेतर कर्मचारी यांच्यासह पालकांचेही अभिनंदन होत आहे. अनुभूती स्कूलचे संचालक मंडळ, अशोक जैन, अतुल जैन, निशा अनिल जैन, देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

"श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या विचारांवर आधारित शैक्षणिक मूल्यांसह सामाजिक संवेदना

जपणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदाही १०० टक्के निकाल राखला. याबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन! निसर्गरम्य वातावरण, स्पर्धात्मक जगाशी सामना करण्याची ताकद अनुभूतीच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. नुकतेच एज्युकेशन वर्ल्ड दिल्ली आणि एज्युकेशन टुडे बेंगलूर या देशातील शिक्षण क्षेत्रात नामांकित रेटिंग एजन्सींनी महाराष्ट्रातून पहिला क्रमांक तर संपूर्ण भारतामध्ये अग्रस्थानी नामांकित केले आहे."
अतुल जैन, अध्यक्ष, अनुभूती निवासी स्कूल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news