जीर्ण अतिसाराचा त्रास आहे का? यावर ‘हे’ उपाय करा

जीर्ण अतिसाराचा त्रास आहे का? यावर ‘हे’ उपाय करा
Published on
Updated on

जीर्ण अतिसार हा स्वतः आजाराचा प्रकार नसून अनेक व्याधी आणि आजारांचे लक्षण आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. मोठ्या आतड्याचा कर्करोग, डायव्हर्टी कोलायटिस, अल्सरेटीव्ह कोलायटिस तसेच पूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेचा परिणाम, संसर्ग, कृमी इत्यादी कारणांमुळे ही व्याधी निर्माण होते. असा त्रास प्रौढावस्थेत अधिक होतो. म्हणूनच प्रौढ व्यक्तींनी नियमितपणे शारीरिक तपासणी करून घेतली पाहिजे.

मळामध्ये रक्त आणि म्युकस असणे हे जुलाब होण्याचे लक्षण आहे. अतिसारच नाही तर कर्करोग झाल्यानंतरही असे होऊ शकते. असाध्य अतिसार अथवा डायरियाने त्रस्त असल्यास डॉक्टरांकडे जाऊन चांगल्या प्रकारे तपासणी करून घेतली पाहिजे.

जुलाबाचे वेगवेगळे प्रकार आणि कारणे आहेत. त्यापैकी आव हा एक प्रकार आहे. या त्रासाचे कारण, मोठ्या आतड्यात आणि मलाशयाची सूज हे आहे. यामध्ये पोटदुखी आणि रक्त व म्युकसयुक्त शौच वारंवार होते. हे संसर्गामुळे होते. आव दोन प्रकारची असते. त्यापैकी एक म्हणजे बॅसिलियरी डिसेंट्री. या आजाराचे कारण शिंगेला प्रजातीचे जंतू होय. हा आजार अधिक लोकसंख्या तसेच अस्वच्छ क्षेत्रामध्ये महामारीच्या रूपात दिसतो.

उष्ण कटिबंधीय प्रदेशात हा आजार माश्या, अस्वच्छ हात यामुळे पसरतो. काही वेळा बॅसिलिअरी डिसेंट्री खूप कमी प्रमाणात अर्थात पातळ जुलाबाच्या रूपात थोड्याशा वेदनांसोबत होते. त्यामुळे नेमके निदान करणे कठीण होते. काही वेळा बॅसिलियरी डिसेंट्री इतक्या तीव्र आणि भयंकर असतात की, केवळ 48 तासांच्या आत रुग्णाचा मृत्यूदेखील ओढावू शकतो. अर्थात असे क्वचितच होते.

अ‍ॅमिबीक डिसेंट्री –

सामान्यपणे अल्पसा ताप अथवा ताप नसतानासुद्धा असे जुलाब होतात. असे जुलाब मोठ्या आतड्यात अल्सर निर्माण करतात. तसेच संसर्ग लिव्हरपर्यंत पसरून तेथे फोड बनू शकतात. पोटात गडबड आणि वेदना ही लक्षणे या आजारात सामान्यपणे दिसतात. दिवसात दोन किंवा त्यापेक्षा अधिक पातळ जुलाब होऊ शकतात. अतिसार किंवा बद्धकोष्ठता अनुक्रमे होते. सकाळी मळामध्ये म्युकस असते. मळाला तीव्र वास असतो. पोटात अचानक दुखते.

सामान्यपणे अतिसार झाल्यास आराम करण्याचा सल्ला देण्यात येतो. यामुळे संक्रमणही पसरत नाही. याखेरीज पेय पदार्थांचे सेवन, कमी फायबरयुक्त आहार आणि औषधांचा प्रयोगदेखील करता येऊ शकतो. दिवसभर विश्रांती आणि एक दिवसाचा उपवास करावा. तसेच ग्लुकोजचे पाणी किंवा ताज्या फळांचा रस जेव्हा गरज असेल तेव्हा थोड्या थोड्या प्रमाणात पित राहावे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news