राठोडांच्या उमेदवारीला चित्रा वाघ यांचा विरोध

राठोडांच्या उमेदवारीला चित्रा वाघ यांचा विरोध

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांना भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा विरोध कायम आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राठोडांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याने विरोधाची धार तीव्र करत चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या उमेदवारीला माझा कायम विरोध राहील, असे स्पष्ट केले आहे. वाघ यांच्या भूमिकेमुळे महायुतीत संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

राठोड यांच्या विरोधातील आपला लढा अद्याप संपलेला नाही, असे सांगून चित्रा वाघ म्हणाल्या, की राठोड यांच्यासंदर्भात दाखल केलेली मुंबई उच्च न्यायालयातील याचिका आजही तशीच असून, ती कधीही मागे घेणार नाही. उद्धव ठाकरेंचे सरकार असताना राठोड यांना 'क्लीन चिट' मिळाली होती.

पूजा चव्हाण आत्महत्येपासून संघर्ष

पुण्यातील पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड आणि चित्रा वाघ यांच्यात वाद रंगला होता. राठोड यांच्यामुळेच पूजाने आत्महत्या केली, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. राठोड यांच्या विरोधात त्यांनी लढाही सुरू केला होता. त्यामुळे राठोडांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, नंतर पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. आता लोकसभा निवडणुकीतही उतरवले जाणार असल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news