Xiaomi India कडून ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांना धक्का, ‘हे’ आहे कारण

Xiaomi India कडून ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांना धक्का, ‘हे’ आहे कारण

पुढारी ऑनलाईन : चीनचा स्मार्टफोन ब्रँड शाओमी इंडिया (Xiaomi India) ने त्यांच्या व्यवसायाच्या संरचनेत बदल करत आहे. या अंतर्गत कंपनी नोकरकपात करणार आहे. Xiaomi India कर्मचाऱ्यांची संख्या १ हजारच्या खाली आणण्याची योजना आखत आहे. इकॉनॉमिक टाईम्सने विद्यमान आणि माजी कर्मचार्‍यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, Xiaomi India ने नोकरकपात धोरण सुरू केले आहे. त्यांचे उद्दिष्ट कर्मचारी संख्या १ हजारपेक्षा कमी करण्याचे आहे.

२०२३ च्या सुरुवातीस Xiaomi India कडे १,४०० ते १,५० कर्मचारी काम करत होते. पण अलिकडील काही दिवसात कंपनीने सुमारे ३० कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. पुढील महिन्यात आणखी काही कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार आहे.

Xiaomi इंडिया वेगाने बदलणाऱ्या बाजारातील परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या आणि ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून नोकरकपात करत असल्याचे समजते. शेअर बाजारात त्यांच्या शेअर्सची घसरण झाली आहे. त्यात सरकारी एजन्सीकडून होत असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर शाओमी इंडिया कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

मार्केट ट्रॅक करणाऱ्या काउंटरपॉइंट रिसर्चच्या माहितीनुसार, १० हजारांहून कमी किमतीच्या स्मार्टफोन श्रेणीत शाओमीचा दबदबा होता. पण या श्रेणीतील स्मार्टफोन विक्रीत ४४ टक्के घट झाली आहे.

तसेच चीनच्या स्मार्टफोन उत्पादक शाओमी कंपनीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) याआधीच जोरदार दणका दिला आहे. 'शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लिमिटेड' या 'शाओमी'च्या भारतीय उपकंपनीची ५ हजार ५५१ कोटी २७ लाख रुपयांची संपत्ती 'ईडी'ने गोठवली आहे. परकीय चलन विनिमय कायदा १९९ नुसार (फेमा कायदा) ही कारवाई करण्यात आली. मोबाईल कम्युनिकेशन आणि मोबाईल हँडसेट उत्पादनाच्या क्षेत्रातील विविध चिनी कंपन्यांकडून सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) जप्त केलेल्या कागदपत्रांवरून या कंपन्या भारतात प्राप्तिकर कायद्याचे तसेच 'फेमा' कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे उघड झाले होते.

७ वर्षांत चीनची केली चांदी

-'शाओमी' या चिनी कंपनीने शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लिमिटेडच्या माध्यमातून २०१४ मध्ये भारतात व्यवसाय सुरू केला.
– २०१५ पासून ही कंपनी 'फेमा' कायद्याचे उल्लंघन करून चीनमधील मुख्य कंपनीला कोट्यवधी रुपये रॉयल्टीच्या नावाने पाठवत होती.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news