काटेरी हातोड्यांची चिन्यांकडून जमवाजमव; पुन्हा गलवान घडविण्याचा ड्रॅगनचा डाव?

काटेरी हातोड्यांची चिन्यांकडून जमवाजमव; पुन्हा गलवान घडविण्याचा ड्रॅगनचा डाव?

बीजिंग : वृत्तसंस्था : गलवान संघर्षात वापरलेली तीक्ष्ण आणि टोकदार शस्त्रे चिनी लष्कराने पुन्हा खरेदी केली आहेत. चिनी सोशल मीडिया अॅप वीबोवर या शस्त्रांसह चिनी सैनिकांची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. या शस्त्राला कम्बाइंड मेस या नावाने ओळखले जाते. कोल्ड वेपन श्रेणीतील ते मोडते. गलवान खोऱ्यात १४-१५ जून २०२० च्या मध्यरात्री झालेल्या धुमश्चक्रीत चिनी सैन्याने ही शस्त्रे वापरली होती. शस्त्राची लांबी १.८ मीटर असून, एका काटेदार हातोड्यासारखे ते दिसते. या शस्त्रांचा वापर चीनकडून पुन्हा शक्य आहे.
चीनने जवळपास २६०० कम्बाइंड मेस खरेदी केल्याचे एका वृत्तात म्हटले आहे.

चीनने त्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये ऑर्डर दिली होती. फेब्रुवारीत ही शस्त्रे खरेदी करण्यात आल्याचे खुद्द चिनी लष्करानेच जाहीर केले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news