चिंचवड पोटनिवडणूक निकाल : निकालासाठी केवळ ७ फेऱ्या बाकी ; जगतापांच्या बालेकिल्ल्यात मताधिक्य वाढणार ?

चिंचवड पोटनिवडणूक निकाल : निकालासाठी केवळ ७ फेऱ्या बाकी ; जगतापांच्या बालेकिल्ल्यात मताधिक्य वाढणार ?

पुढारी डिजिटल : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेल्या अश्विनी लक्ष्मण जगताप आता विजयाच्या समीप जाताना दिसत आहेत. नुकताच ३० व्या फेरीची मतमोजणी समोर आली आहे. तिसाव्या फेरीत अश्विनी यांना 1,12,113 मतं मिळाली आहेत. तर माविआ च्या नाना काटे यांना 84,384 मतं मिळाली आहेत.

तर या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या राहुल कलाटे यांना 38,900 इतकी मतं मिळाली आहेत. या फेरीत अश्विनी जगताप या जगताप 27,729 ने पुढे आहेत. विशेष म्हणजे या सात भागांपैकी पिंपळे गुरव, नवी सांगवी, सांगवी च्या भागातील मतमोजणी शिल्लक आहे. हा भाग दिवंगत आमदार लक्षण जगताप यांचा बालेकिल्ला समजला जातो . त्यामुळे या ठिकाणी अश्विनी जगताप यांचं मताधिक्य वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news