ठाणे – ३७ वर्षे निरंतर चिंचपाडा मंदिरात कृष्ण जन्माष्टमी साजरी

ठाणे
ठाणे

सापाड (ठाणे):

भारतीय संस्कृतीची जोपासना आणि सण-उत्सवातील जीवंतपणा जागृत ठेवण्यासाठी कल्याण पूर्व चिंचपाडा गावातील जनार्धन म्हात्रे यांच्या घराशेजारी असणारे श्री कृष्ण मंदिरात कृष्णजन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. कृष्ण जन्माचे स्वागत करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने श्री कृष्णाचे पूजन करून देवा-ब्राम्हणाच्या साक्षीने श्री कृष्णाजन्माष्टमी साजरी करण्यात आली.

श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात सण-उत्सव साजरे केले जातात. कृष्णजन्माष्टमी श्रावणातील सर्वात मोठा सण आहे. भारतीय सण-परंपरा जोपासण्यासाठी कृष्ण भक्त जनार्धन म्हात्रे यांनी कृष्णजन्माष्टमी मोठ्या उत्साही वातावरणात श्री कृष्ण मंदिरात रात्री बारा वाजता साजरी करण्यात आली. यावेळी श्री कृष्णाचे मंदिर विविध फुलांनी सजवण्यात आले होते. श्री कृष्ण मूर्तीसाठी नवीन वस्त्रे आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. श्री कृष्ण जन्मासाठी १२१ मिठाईचे नैवेद्य दाखवण्यात आले. मंदिराभोवती विविध रंगाची रोषणाई आणि मंदिर परिसर शेकडो दिव्यांनी प्रकाशमय करण्यात आले.

कृष्ण जन्माष्टमी उत्सवातील उत्साह द्विगुणित करण्यासाठी भाविकांची मंदिर परिसरात गर्दी करून दर्शनासाठी गदीर् केली होती. कृष्णाजन्माष्टमी निमित्ताने भजन-कीर्तनाचा सूर मंदिराच्या चारही दिशेने दरवळत होता. श्री कृष्ण जन्माचे जीवनचरित्र ऐकण्यासाठी भक्तांची मोट्या प्रमाणात गर्दी दिसून आली. प्रसंगी कृष्णाच्या गीतांमध्ये बेधुंद होऊन नाचणारे भक्तगण उपस्थितांचे आकर्षक ठरले.
साधू-संतांच्या उपस्थित परमेश्वराची मनोभावे पूजन करून पृथ्वीवासियांना सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. श्री कृष्ण भक्त एकनाथ म्हात्रे यांनी कृष्णाजन्माष्टमी निमित्ताने बाळ कृष्णाकडे व्यक्त केली. गेली ३७ वर्षे निरंतर चिंचपाडा कृष्ण मंदिरात कृष्ण जन्माष्टमी भक्तिमय वातावरणात साजरी होत असते.

ग्रामस्थांची श्रध्दा आहे की, चिंचपाडा गावात कृष्ण मंदिर बांधल्या नंतर गावातील दुःख-दारिद्र-चिंता-भांडण दूर होऊन गावात सुखी-शांती नांदू लागली. तर चिंचपाडा गावात ९९.९९ टक्के गावठी दारू बनवण्याचे व्यवसाय होते. कृष्ण मंदिर बांधल्यानंतर गावातील दारूचे १०० टक्के व्यवसाय बंद होऊन ग्रामस्थ व्यसनमुक्त झाले असल्याचेही कृष्ण भक्त एकनाथ म्हात्रे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news