चीन प्रतिस्पर्धी देशांच्या उपग्रहांवर कब्जा करणार?

चीन प्रतिस्पर्धी देशांच्या उपग्रहांवर कब्जा करणार?

वॉशिंग्टन : चीन सैन्य संचार उपग्रहांना बाधित करण्यासाठी हायटेक सायबर हल्याचे तंत्र विकसित करत असल्याची भीती अमेरिकन संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने व्यक्त केली आहे. आता उपग्रहांवर हल्ले करून ते निष्प्रभ करता येतात का, याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही.

सिग्नल हस्तक्षेपाची समस्या कशी दूर करायची, यावर यापूर्वी विविध राष्ट्रांतील अनेक कंपन्यांनी, संशोधन संस्थांनी सखोल विचार केला आहे. आर्थिक देवाण-घेवाण, नेव्हिगेशन, हवामान अंदाज व इंटरनेट सेवांपासून आपल्या जीवनाचा जवळपास प्रत्येक पैलू उपग्रहांशी निगडीत असतो; पण असे हल्ले झाल्यास मोजक्या ग्रहांवर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. किरकोळ एक-दोन उपग्रह हरवले तरी ती फार मोठी समस्या नसेल, असे संकेत आहेत.

तसे पाहता, चीनचा अंतराळ कार्यक्रम हा अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक वेगाने पुढे चालला आहे. चीनचे पहिले यशस्वी प्रक्षेपण 1970 मध्ये झाले होते. 1999 मध्ये त्यांनी शेनझोऊ-1 प्रक्षेपणाच्या माध्यमातून मानवरहित, मानवसहित उपक्रमांतर्गत महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले. चीनने 2010 ते 2019 या दरम्यान 200 पेक्षा अधिक उपग्रह रवाना केले. 2022 मध्ये तर त्यांनी 53 रॉकेट लाँच केले आणि यात त्यांना 100 टक्के यश लाभले.

सध्या चीन एखादा उपग्रह नियंत्रणात घेता येईल का, याची चाचपणी करत असून याद्वारे ठराविक देशाचा डाटा उपलब्ध व्हावा व ते निष्प्रभ करता येते का, हे पाहण्याचा त्यांचा विचार आहे. आता अमेरिका व अन्य प्रगतशील देश देखील अशा प्रयत्नात असू शकतात. उपग्रह हे अनेक उंचीवर ग्रहांची परिक्रमा करत असतात. यातील सर्वात कमी स्थिर कक्षा 300 कि.मी. इतकी असून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन व हबल स्पेस टेलिस्कोप 500 कि.मी. उंचीवर आहे.

अंतराळातील कचरा हटवण्याकरिता डिझाईन केले गेलेले काही छोटे उपग्रह मागील काही वर्षांत लाँच करण्यात आले. मात्र, पूर्ण क्षमतेने कार्यरत असलेल्या व संचलित उपग्रहांना पकडण्यात अनेक खडतर आव्हाने असतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news