China Super Soldier’s : डीएनए प्रयोगातून चीन तयार करतोय सुपर सोल्जर ! न खाता, न झोपता लढणार, आजारीही नाही पडणार

China Super Soldier's
China Super Soldier's
Published on
Updated on

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : डीएनएमध्ये बदल करून सुपर सोल्जर (China Super Soldier's) बनविण्याची चीनची योजना असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या या दाव्याला ब्रिटननेही दुजोरा दिला आहे.

इमॅन्युएल आणि जेनिफर या फ्रान्समधील दोघा महिला शास्त्रज्ञांनी क्रिश्पर नावाचे एक तंत्रज्ञान शोधून काढल्याचा दावा २०१२ मध्ये केला होता. या तंत्रज्ञानातून डीएनएमध्ये बदल करून हवे तसे मूल जन्माला घालता येऊ शकते. पुढे जाऊन एडस् आदी आजारांना बळी पडणार नाही, अशी या मुलाची रचना या तंत्रातून करता येऊ शकेल, असे या दोघींचे म्हणणे होते. आता चीन याच तंत्राच्या बळावर सुपर सोल्जर (China Super Soldier's) तयार करत असल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. हे सुपर सोल्जर झोप घेतल्याशिवाय तसेच काही खायला मिळाले नाही तरी युद्धभूमीत सतत अनेक दिवस लढू शकतील आणि आजारीही पडणार नाहीत. अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या मते चीनने किश्वर तंत्राच्या मदतीने २०२० मध्येच हे काम सुरू केले आहे.

याआधी नोव्हेंबर २०१८ मध्ये चीनमधील एक शास्त्रज्ञ जियांग कुई यांनी जगातील पहिली डिझायनर बेबी (अपेक्षित मूल) तयार करण्यात यश आल्याचा दावा केला होता, जियांग यांनी एका भ्रूणाच्या डीएनएमध्ये बदल घडवून आणला होता. लुलू आणि नाना अशी जुळी यातून जन्माला आली होती. एचआयव्ही वा अन्य विषाणूंचा या मुलांवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही, अशी त्यांची संरचना याद्वारे करण्यात आली होती. डिझायनर बेबी तयार केल्यानंतर पुढे दोन म्हणजे २०२० मध्ये या तंत्रावर आधारित सुपर सोल्जर तार करण्याचे कामही चीनने सुरू केलेले होते, असेही अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे. अन्य एका अहवालानुसार अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशियामध्येही सुपर सोल्जर तयार करण्याचे काम सुरू आहे.

(China Super Soldier's) 'डीएनए'त बदल म्हणजे काय?

  • डीएनए हा प्रत्येक सजीवाचा मूलाधार आहे. डीएनएच्या काही भागांना जिन्स म्हटले जाते. जिन्स आई-वडिलांकडून येतात. तंत्रज्ञानाच्या साह्याने डीएनएत बदल केला जातो म्हणजे या जिन्स संपादन केले जाते.
  • या तंत्राआधारे फळे, भाजीपाल्यातही अनेक प्रयोग झालेत व सुरू आहेत. अधिक पोषण व्हावे, किडीला आजाराला त्या बळी पडू नयेत या बाबी साध्य झाल्या. आता याच तंत्रातून सुपर सोल्जर तयार केले जात आहेत.

असे असतील सुपर सोल्जर

  • सुपर सोल्जर निर्दयी असतील.
  • अचूक लक्ष्यवेध करतील.
  • रसायनांचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही.
  • रासायनिक युद्धातही ते उपयुक्त ठरतील.
  • जेनेटिक मॉडिफिकेशनमुळे जखमी होऊनही मैदानात कायम राहतील.
  • अन्न आणि झोपेशिवाय कितीतरी दिवस सतत लढतील.

जगातील सर्वाधिक शक्तिशाली देश बनण्यासाठी चीन कुठल्याही थराला जाऊ शकतो. सुपर सोल्जर निर्मिती हा त्यातलाच एक भाग आहे.

– जॉन रॅटक्लिफ, माजी संचालक, सीआयए, अमेरिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news