पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेला पराभूत करण्यासाठी चीन मागील अर्धशतक तयारी करत आहे. यापूर्वीच चिनी सैन्याने अमेरिकेच्या सशस्त्र दलांच्या बरोबरीने आहे. आता चीन युद्धाची तयारी करत आहे, असा दावा रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या आणि अध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवार निक्की हेली ( Nikki Haley) यांनी केला. शुक्रवारी ( दि. २२ ) न्यू हॅम्पशायरमध्ये अर्थव्यवस्थेसंदर्भातील भाषणात त्या बोलत होत्या.
यावेळी निक्की हेली म्हणाल्या की, आपल्या राष्ट्रीय अस्तित्वासाठी सामर्थ्य आणि अभिमान आवश्यक आहे, विशेषत: साम्यवादी चीनचा सामना करताना. चीन हा एक अस्तित्वाचा धोका आहे. आम्हाला पराभूत करण्यासाठी त्याने अर्धशतक घालवले आहे,"
चीनने आमची व्यापाराची नीती घेतली. आता ते औषधांपासून ते प्रगत तंत्रज्ञानापर्यंत.अमेरिकेतील महत्त्वाच्या उद्योगांवर नियंत्रण ठेवत आहे, चीन आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशातून पृथ्वीवरील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. कम्युनिस्ट पक्षाचे हेतू स्पष्ट आहेत. ते एक प्रचंड अत्याधुनिक सैन्य तयार करत आहेत.अमेरिकेला धमकावण्यास आणि आशिया आणि त्यापलीकडे वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहेत, असा दावाही त्यांनी केला.
चीनचे सैन्य आधीच अमेरिकेच्या सशस्त्र दलांच्या बरोबरीचे आहे. हा देश आता आमच्या आकाशात गुप्तचर फुगे पाठवत आहे. तसेच आमच्याविरोधात क्युबामध्ये एक गुप्तचर तळ तयार करत आहेत. कोणतीही चूक करू नका. कम्युनिस्ट पक्ष युद्धाच्या तयारीत आहे. आणि चीनच्या नेत्यांचा विजयाचा निर्धार करत आहेत, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा :