China Earthquake: चीन भूकंपाने हादरले; किंघाई शहरात घबराट

Earthquake
Earthquake
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमधील किंघाई शहरात आज (दि.६मार्च)  भूकंपाचा  धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ५ रिश्टर स्केल इतकी नाेंदली गेली होती. दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के बसले, याचा केंद्रबिंदू १८० किमी खोलीवर होता. भूकंपाची तीव्रता जरी अधिक असली तरी अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही, असे वृत्त 'ANI'ने दिले आहे. (China, Earthquake)

गेल्या ४८ तासांत चीनमधील हा दुसरा मोठा भूकंप आहे. यापूर्वी मंगळवारी (दि.५ मार्च) देखील चीनमधील किंघाई येथे भूकंपाचे तीव्र धक्के बसले होते. या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता ५.२ रिश्टर इतकी होती तसेच या भूकंपाचा केंद्रबिदू १० किमी खोलीवर होता, असेही राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news