नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: बालकांच्या तस्करीत उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. तर कोरोना संकट संपल्यानंतरच्या काळात ज्या ठिकाणी बाल तस्करीचे सर्वात जास्त वेगाने वाढले आहे, त्यात दिल्ली आघाडीवर असल्याची माहिती कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन आणि अन्य एका संस्थेच्या पाहणीत (Child Trafficking) आढळून आली आहे.
वर्ष 2016 ते 2022 या कालावधीत झालेल्या बालकांच्या तस्करीच्या आकडेवारीचा अभ्यास करून हा अहवाल बनविण्यात आला आहे. बाल तस्करी रोखण्यासाठी कोण कोणते उपाय योजता येतील, याचा उहापोहही या अहवालात (Child Trafficking) करण्यात आलेला आहे.